श्रीरामपूर प्रतिनिधी:
 त्रिदल सैनिक सेवा संघ शाखा श्रीरामपूर व आजी - माजी सैनिक संघटनेच्या वतीने शुक्रवार दिनांक २६ जानेवारी २०२४  रोजी सकाळी ठीक ८.०० वाजता येथील शहीद स्मारकास सर्व माजी सैनिक वंदन करून संघटनेचे ज्येष्ठ माजी सैनिक मा. वसंतराव कराळे  यांच्या हस्ते ७५ व्या गणतंत्र दिना निमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, तरी सर्व माजी सैनिकांनी आपल्या परिवारासह, वीर माता , वीर पत्नी यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना देण्याकरिता उपस्थित रहावे तसेच मानवंदना संपल्यानंतर लगेचच मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व माजी सैनिकांनी मोटरसायकल रॅलीमधे सहभाग घ्यावा.

रॅली मार्ग मार्ग, शहीद स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज रोड, नगर परिषद येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण, छत्रपती शिवाजी चौक, हनुमान मंदिर जवळील स्वातंत्र्य सैनिक अशोक स्तंभास (क्रांती स्तंभास) पुष्पहार अर्पण , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण,महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण ,मेन रोडवरून रॅली समाप्त शहीद स्मारक असा असेल,असे संघटनेच्या वतीने कळवण्यात आले आहे.

*पत्रकार राजू मिर्जा*
ब्यूरो चिफ: नाशिक विभाग
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111