shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन होणारच ...


प्रतिनिधी : आसावरी वायकर
 
 सोलापूर :  दि . २४ /   अक्कलकोट पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे यांच्या विरुद्ध असंख्य गंभीर आणि महिलांच्या तक्रारी असताना आर्थिक व्यवहारातून त्यांना प्रभारी पद देण्यात आले आहे. याबाबत पुराव्यानिशी तक्रारी दाखल केल्यानंतरही शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले प्राथमिक यांनी त्यांच्यावर कसलीही कारवाई केली नाही.उलट त्यांना प्रभारी पद मिळण्याअगोदर विविध सामाजिक संघटनाने उपोषणासारखे तीव्र आंदोलन केले होते.त्या आंदोलनानंतरही प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी आर्थिक मांडवली करून त्यांना प्रभारी पद दिले,अशी तक्रार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक, माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवराज कांबळे यांनी केले.उद्या विविध सामाजिक संघटनांच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर येथे सकाळी अकरा वाजता हलगीनाद आंदोलन करण्यात येणार आहे. यास सर्वस्वी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे निष्क्रिय प्रशासन जबाबदार असल्याचे कांबळे यांनी म्हटले आहे .
close