बोराटवाडी विद्यालयात जून महिन्यापासून विज्ञान शाखेचा अकरावीचा वर्ग सुरू केला जाईल - हर्षवर्धन पाटील
बोराटवाडी येथील लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध गुणदर्शन स्नेह सोहळा संपन्न
इंदापूर: बोरवाडी (ता. इंदापूर )येथील लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयचा हर्ष स्पंद स्नेह सोहळा दि २३ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी माजी मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून उद्घाटन संपन्न झाले.
याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या मनोगत म्हटले की, ग्रामीण भागातील मुलांच्या कलेला वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यातील विविध गुणदर्शन व्हावे त्यासाठीच हे व्यासपीठ तयार केले आहे.
लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आपण साजरा करत आहोत. जवळ जवळ ४ ते ५ हजार माजी विद्यार्थी या विद्यालयांमध्ये गुणवत्ता पूर्ण विद्यार्थी घडवले जात आहेत .शंभर टक्के निकालाची दहावीची परंपरा या ठिकाणी आहे. गोरगरीब सामान्य मुलांना आणि मुलींना आपल्या जवळच्या विद्यालयामध्ये शिकता यावे या विचारानेच आणि गरजेचा विचार करून हे विद्यालयाची उभारणी केली. या विद्यालयासाठी गावकऱ्यांनी जागा दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद पाटील यांनी मानले.
तसेच ते पुढे म्हणाले की, पुढील वर्षी जून महिन्यापासून विज्ञान शाखेचा अकरावीचा वर्ग या ठिकाणी सुरू केला जाईल त्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षकांची निवड करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले . श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी अंतर्गत जेवढ्या शाखा आहेत त्या सर्व शाखा मधून उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम दर्शवणाऱ्या शाखेला पुरस्कार देणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी श्री.शिवाजी एज्युकेशन सोसा.सचिव किरण पाटील,सुरेश मेहेर, दत्तु अण्णा सवासे,दयानंद गायकवाड,रामचंद्र पाटील, मनोज जगदाळे,कृष्णा बोराडे,शिवाजी कोरटकर,संजय घोगरे, अजिनाथ बोराडे,लालासो हेगडकर,तुकाराम बर्गे,रमेश बोराडे,विनोद सावंत,मोहन मारकाड, आबासो मारकड,भारत काळकुटे, पोपट सुद्रिक,अर्जुन सूद्रिक इ. उपस्थित होते.
या स्नेहसोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी सामाजिक, शैक्षणिक ,वैद्यकीय ,देशभक्तीपर तसेच जनजागृती पर अशी विविध गीत नृत्य अविष्कारातून उपस्थित पालक वर्गांचे व संस्थेच्या मान्यवरांचे मन जिंकली .त्यास पालक वर्गातून बक्षीस रुपये पैशाने भरभरून साथ दिली व विद्यार्थ्यांचे त्यांच्या कलांचे त्यांनी भरभरून कौतुक केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भीमराव आवारे सर यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन निलाखे सर यांनी केले.

