shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एमआयएम पुर्ण ताकदीने सर्व**निवडणूका लढविणार - शेख


श्रीरामपूर प्रतिनिधी:
ऑल इंडिया मज्लिस ए इत्तेहादूल मुस्लमिन (एम.आय.एम.) पुर्ण ताकदीने सर्व निवडणुका लढविणार असल्याचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष रफीक शेख यांनी सांगितले.

आमच्या प्रतिनिधींशी बोलताना पुढे ते असेही म्हणाले की, लवकरच देशात लोकसभा निवडणूक होत आहे सोबतच राज्याच्या विधानसभा निवडणुका देखील पुढे उभ्या ठाकल्या आहेत, या दोन्ही निवडणूकी सोबतच जिल्हा परिषद, पंचायत समिती,नगर पालिका,महानगर पालिका तसेच ग्रामपंचायती निवडणूका देखील एम आय एम पक्ष लढविणार असल्याचे पक्ष श्रेष्टींचा आदेश असल्याने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.बॅ.असदूद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वात तथा प्रदेशाध्यक्ष खा.इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच्या सर्व निवडणुका पुर्ण ताकदीने लढविणार असल्याचे देखील यावेळी ते म्हणाले,
पक्षाच्या माध्यमातून जनसामान्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांसाठी नेहमी अग्रेसर राहून सातत्याने संघर्ष करणाऱ्या एम आय एम पक्षाला श्रीरामपूर तालुक्यात मोठे पोषक वातावरण निर्माण झालेले आहे.करीता विधानसभा निवडणूकीसह सर्वच निवडणूका लढविण्याचा पक्षाचा मानस असल्याचेही शेवटी श्री.शेख म्हणाले.

*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close