shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बोरी येथे २००२ व २००३ दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन मेळावा उत्साहात

बोरी येथे २००२ व २००३ दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन मेळावा उत्साहात 
इंदापूर: दि १८ जानेवारी रोजी येथे २००२ व २००३ दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन मेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी सर्व आजी माजी शिक्षक उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष सूडगे सर,प्रमुख पाहुणे निकम सर , मारकड सर, मरळे सर, खारतोडे सर, झारगड मॅडम, राठोड सर, अर्जुन सर, रणदिवे मॅडम, जाधव मॅडम, सूडगे मॅडम, भोसले मॅडम, धालपे मॅडम,देवडे मॅडम, शिंदेमामा,धोत्रे मामा उपस्थित होते.
२००३ माजी विद्यार्थी आणि विध्यार्थिनी यांनी प्रथम प्रार्थना  करत सत्कार समारंभ संपन्न झाला. यानंतर दिवंगत शिक्षक आणि विद्यार्थी यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच सरस्वती प्रतिमेचे पूजन व दीप प्रजलन करून माजी विद्यार्थी परिचय करण्यात आले .यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी मार्गदर्शनपर शिक्षकांची भाषणे झाली.
शाळेतील आजी माजी विध्यार्थी व शिक्षक यांना  स्नेहभोजन केले व समारोप केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश शिंदे सर यांनी केले.
close