निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था पुणेवतीने
महिला आणि किशोवयीन मुली यांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.
इंदापूर: दिनांक १५ आणि १६ फेब्रुवारी २०२४
निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था पुणे च्या माध्यमातून संस्थेच्या कार्यक्षेत्रातील निमसाखर, गोतोंडी, व्याहळी, काटी, लासुर्णे, सणसर,अंथुर्णे गावातील भटके -विमुक्त वाड्या - वस्त्यांवर, पालावर परसबाग केलेल्या महिला आणि किशोवयीन मुली यांचे आरोग्य तपासणी शिबिर पार पडले.
निमसाखर येथे आरोग्य तपासणी शिबिर यांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये निमसाखर गावातील परसबाग केलेल्या महिलांची व किशोवयीन मुलींच्या रक्तातील Hb ची तपासणी करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती डॉ. तोडकर मॅडम यांची होती. त्यांनी उपस्थित महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. जसे की आपल्या शरीरास आवश्यक असेल घटक मिळणे जरुरी आहे. महिला प्रामुख्याने जास्त काम करतात पण त्यांचा आहार हा सकस नसतो. त्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवू लागतो. आणि त्यांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी पाहायला मिळते. लोह, कॅल्शियम यांसारखे घटक त्यांच्या खाण्यात यायला हवेत. हे घटक पालेभाज्यांमध्ये जास्त प्रमाणात मिळतात.
केस गळणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार होणे, सतत तोंड येणे, भूक न लागणे, हाताच्या बोटामध्ये कोरडे पणा जाणवणे या सारखे लक्षण दिसू लागले की आपल्या शरीरात आवश्यक असणाऱ्या घटकांचे प्रमाण कमी आहे असे समजावे.
त्यासाठी हिरव्या पालेभाज्या, नियमित आहार, सकस आहार, गूळ आणि शेंगदाणे, तसेच चिक्की खाणे जेणे करून महिलांमध्ये रक्ताचे प्रमाण वाढेल. तसेच या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये लहान मुलांची उंची आणि वजन घेण्यात आले.
या उद्घाटन प्रसंगी हेल्थ केअर क्लिनिक चे ऋषिकेश खरात, निमसाखर गावातील आशा वर्कर, आणि निर्माण संस्थेच्या वतीने रवी पवार, निर्मला नाईक, संकेश तोरणे, अश्विनी चव्हाण, वैशाली चव्हाण, अतुल सर, सारिका ताई, प्रियांका ताई, दिपाली ताई, मधुमिता मॅडम, दीक्षा चंदनशिवे हे उपस्थित होते.

