लियाकतखान जी पठाण - संगमनेर
अंजुमन इस्लाम ट्रस्टच्या चिफ ट्रस्टी (मुख्य विश्वस्त)पदी अब्दुल्लाह चौधरी व संस्थेच्या सचिव पदी हाजी शौकतखान पठाण यांची नियुक्ती झाल्याबद्दल, जवाहरलाल नेहरू ऊर्दू सेंटर, संगमनेर,संघर्ष सेवाभावी संस्था, सम्मान समिती, सहारा फाऊंडेशन,ई. संस्थेच्या वतीने शानदार सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ॲंग्लो ऊर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चे अध्यक्ष श्री.शेख गनी हाजी शेठ होते.
यावेळी संघर्ष सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष ॲड. संग्राम जोंधळे यांनी सुविस्तार भाषण केले. नवनियुक्त चिफ ट्रस्टी अब्दुल्लाह चौधरी यांनी आपल्या भाषणात अनेक पैलूंवर प्रकाश टाकला व संस्थेचे संस्थापक शेखलाल मास्टर यांनी १९१२मध्ये संस्था स्थापन करून व येथील बुजुर्ग मंडळींनीं संस्थेची प्रगती कशी केली,व भविष्यात कशी पुढे वाटचाल करणार याची माहिती दिली. सुत्रसंचलन आपल्या शायरीतुन जवाहरलाल नेहरू ऊर्दू सेंटर संगमनेरचे अध्यक्ष शेख ईदरीस यांनी केले.यावेळी नवनियुक्त सचिव हाजी शौकतखान पठाण, सय्यद असिफ अली, माजी नगरसेवक शेख हबीब बाबु, दत्ता कांडेकर, मुनव्वर सर, इत्यादींची भाषणे झाली., युनुस चौधरी,शानु बेगमपुरे,कमरोद्दीन मणियार,मिया, सय्यद मोमीन पुणे, इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*ज्येष्ठ पत्रकार रियाजभाई शेख - अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

