shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जागतिक सूर्यनमस्कार दिवसानिमित्त विद्या प्रतिष्ठानमध्ये योगशिबिर.

*जागतिक सूर्यनमस्कार दिवसानिमित्त विद्या प्रतिष्ठानमध्ये योगशिबिर*

इंदापूर :- इंदापूर जागतिक सूर्यनमस्कार दिवस म्हणजे सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा संकल्प दिवस यानिमित्ताने इंदापूर पतंजली योग समिती व युवा भारत च्या वतीने विद्या प्रतिष्ठानच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना योगासने आणि सूर्यनमस्कार यांची प्रात्यक्षिके घेण्यात आली. 
पतंजलिचे योगशिक्षक  प्रशांत गिड्डे ,सायरा आतार,वर्षा ननवरे यांनी  मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक सदृढतेसाठी ताडासन,त्रिकोणासन,विरभद्रासन,गरुडासनचा, वृक्षासनचाही अभ्यास घेण्यात आला.

सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम असून यामध्ये मंत्रोच्चार आसनांची नावे श्वास उच्छवासाची गती आणि शारीरिक स्थिती याचे सह संपूर्ण शास्त्रोक्त माहिती देण्यात आली. शरीर मन आणि श्वासाला एकत्रितपणे जोडणारा सूर्यनमस्कार विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी उपयुक्त असल्यामुळे दररोज सूर्यनमस्कार करण्याचा विद्यार्थ्यांनी यावेळी संकल्प केला..

 विद्या प्रतिष्ठानच्या प्राचार्या डॉक्टर ज्योती जगताप यांनी  मार्गदर्शक योगशिक्षकांचा सन्मान केला. क्रीडाशिक्षक श्री संभाजी पवार आणि दादासाहेब बर्डे शरद झोळ  यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
close