माणुसकीच्या भिंत उपक्रमातून बाल विकास केंद्रास एक हात मदतीचा .
फोटो ओळ - बोरी ता इंदापूर येथील बाल विकास केंद्रातील मुलासमवेत मान्यवर.......
इंदापूर:कळंब ता इंदापूर येथील विश्वासराव रणसिंग माजी विद्यार्थी संघटना यांच्यावतीने माणुसकीची भिंत हा उपक्रम राबविण्यात आला होता.यामध्ये माजी विद्यार्थी व समाजातील घटकांना मदतीचे आव्हान करण्यात आले होते. त्या आव्हानाला प्रतिसाद देत माजी विद्यार्थी व स्थानिक नागरिकांकडून अन्नधान्य, कपडे, शालेय उपयोगी साहित्य इत्यादी वस्तूंचे संकलन करण्यात आले. या सर्व वस्तू बोरी ता. इंदापूर येथील रेव्ह. हरिभाऊ वाघमोडे पाटील प्रतिष्ठानच्या बाल विकास केंद्रास संकलित वस्तू इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग व विश्वस्त राही रणसिंग यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आल्या.यावेळी रेव्ह. हरीभाऊ वाघमोडे पाटील प्रतिष्ठान च्या संस्थापक खजिनदार डॉ सीमा वाघमोडे पाटील यांनी समाजातील वास्तव परिस्थितीत निराधार घटकांसाठी काम करताना आलेले अनुभव व्यक्त केले. इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान चे सचिव विरसिंह रणसिंग यांच्या कन्या शिवानी हिचा वाढदिवस बाल विकास केंद्रातील मुलासमवेत साजरा करण्यात आला. वाढदिवसाचा खर्च टाळून बाल विकास केंद्रातील मुलासाठी शालेय वस्तू व खाऊ देण्यात आला.याप्रसंगी विश्वासराव रणसिंग महाविद्यालय उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग ,प्रा डॉ.तेजश्री हुंबे , मिस रेणु तमंग ,मिस ग्रेस , दिनेश वाघमोडे,शिवराज रणसिंग,दादा जळक ,आण्णा हाके ,सुभाष भंडलकर ,रघुनाथ चव्हाण,ओंकार शिंदे इ मान्यवर उपस्थित होते.

