shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी - आमदार दत्तात्रेय भरणे ....... कॉलेज जीवनातील आठवणींना भरणे यांनी दिला उजाळा .

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी -  आमदार दत्तात्रेय भरणे .......
 कॉलेज जीवनातील आठवणींना भरणे यांनी दिला उजाळा .
फोटो ओळ - कळंब ता इंदापूर येथे विश्वास महोत्सव प्रसंगी आमदार दत्तात्रय भरणे व मान्यवर

इंदापूर:- इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब  तालुका इंदापूर येथे विश्वास महोत्सव स्नेहसंमेलन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कार्यक्रम संपन्न झाला.स्नेहसंमेलनाचे उद्घाटन इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वस्त कुलदीप हेगडे यांच्या हस्ते संपन्न झाला. महाविद्यालयातील यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. स्नेहसमेलन प्रसंगी आमदार भरणे यांनी कॉलेज जीवनात उत्साही वातावरण असते.विद्यार्थी दशेमध्ये कॉलेज जीवनाचा आनंद घेणे तसेच जीवनात वडीलधारी मंडळीचा आदर करणे व आनंदी राहणे हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे मत आमदार भरणे यांनी व्यक्त केले.
 इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग यांनी आमदार भरणे मामाच्या माध्यमातून तालुक्याचा सर्वांगीण व चौफेर विकास होत असून तालुक्यातील शैक्षणिक संस्था प्रगतीपथावर कामकाज करीत आहेत.आमदार भरणे यांनी तालुक्यातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचवली असून शैक्षणिक संस्थांना देखील आर्थिक पाठबळ देत सर्वांगीण विकास केला असल्याचे मत वीरसिंह रणसिंग यांनी व्यक्त केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नृत्य ,गायन ,सामूहिक नृत्य सादर करीत जल्लोष केला. स्नेहसंमेलन प्रसंगी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत रणवरे ,अध्यक्ष आनंदी रणसिंग, उपाध्यक्ष प्रकाश कदम , सचिव वीरसिंह रणसिंग,विश्वस्त कुलदीप हेगडे ,विश्वस्त राही रणसिंग , विश्वस्त शंकरराव रणसिंग, प्राचार्य डॉ . अंकुश आहेर , उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग ,स्नेहसमेलन कार्याध्यक्ष विनायक शिंदे,माजी पंचायत समिती सदस्य सुहास डोंबाळे ,सरपंच विद्या सावंत, पोलीस पाटील सोनाली करडे, योगेश डोंबाळे, पिंटू डोंबाळे ,अतुल सावंत ,शिवाजी कदम ,संतोष रणसिंग ,रामभाऊ रणसिंग, सचिन रणवरे ,दिपक लवटे ,सुलेख रणवरे ,शांताराम रणवरे ,पंकज रणवरे ,हरिश्चंद्र बंडगर,शिवराम अर्जुन इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


close