=============================
प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी* :-
खा. प्रीतम मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आ. नमिता मुंदडा यांच्या वतीने केज शहरात सफाई काम करणाऱ्या महिलांना व वृद्धाश्रमातील महिलांना जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या हस्ते साड्यांचे वाटप करण्यात येऊन विधायक पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.
केज नगर पंचायत मध्ये आयोजित या कार्यक्रमास नगराध्यक्षा सीता बनसोड उपसभापती डॉ वासुदेव नेहरकर, माजी सभापती विष्णू घुले , हारुण इनामदार , सुनील गलांडे, भगवान केदार,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी,नगरसेवक राजु इनामदार, प्रकाश मुंडे,कलिम सय्यद, खैसर इनामदार,डॉ श्रीधर चौरे,सुरेश नांदे, खदीर कुरेशी, संतोष जाधव,विकास जाधव,दत्ता सावंत यांची मुख्य उपस्थिती होती.
जिल्ह्याच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या जन्मदिवस विधायक कार्यांद्वारे साजरा करण्याचा निर्णय आ. नमिता मुंदडा यांनी घेत आपल्या घराबरोबरच गावाची स्वछता करत विधायक कार्य करणाऱ्या महिलांना साडी वाटप करण्याचा निर्णय घेतला व जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या हस्ते केज नगरपंचायत मध्ये सफाई काम करणाऱ्या महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले तसेच शहरातील स्वामी समर्थ वृद्धाश्रमातील महिलांनाही साड्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी शाम इगवे, श्रीमंत चटप,सरपंच राहुल ओव्हाळ,व महिला व नगरपंचायत चे कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

