श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील बेथेल चर्च मिनिस्ट्री यांच्या माध्यमातून इस्टर निमित्त येत्या चाळीस दिवस शहरात विविध ठिकाणी उपवास प्रार्थना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
येशुचे दु:खसहन यावर आधारित प्रभू येशूने आपल्या पापासाठी चाळीस दिवस चाळीस रात्र , प्रार्थना व उपवास करून आपल्यासाठी स्वतःला मरण पत्कारले.आपण सुध्दा आपल्या आध्यात्मिक जीवनाची सुरुवात परत एकदा आजच्या दिवसांपासून करावी, म्हणून ख्रिस्तसभाकडून आपल्याला आवाहन करण्यात येते की, बेथेल चर्चच्या माध्यमातून विविध भागात उपवास प्रार्थना महोत्सव आयोजित केला आहे.याकरिता आपण आजपासून प्रार्थना, उपवास व दानधर्म या तीन गोष्टी केल्यास स्वर्गात त्याचे प्रतिफळ हे मोठे असते.अशा गोष्टी केल्याने आपण प्रभू येशूच्या जवळ जावू शकतो.कारण प्रभू येशू हा आम्हा करिता दुःखाची वाट चालला.व आम्हाला त्याने सुखाची वाट दाखवली म्हणून इस्टर सणाकरिता आध्यात्मिक तयारी करु या.
यासाठी रे.पास्टर सतिश आल्हाट व रे.पास्टर राजेश प्रभूणे आणि सिस्टर नलिनी तसेच बेथेल चर्च लिडर्स ,महिला मंडळ यांनी सर्व भाविकांना या उपवास प्रार्थना महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती केली आहे.
*पत्रकार दीपक कदम - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111

