अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजनेबरोबरच इतरही योजना राबविण्यात येतात. या योजनांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी ११ फेब्रुवारी २०२४ रोजी मौजे लवाळवाडी ता. अकोले येथे सकाळी ११.००  ते सायं. ५.०० या वेळेत एक दिवसीय जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


या जनजागृती मेळाव्यामध्ये कृषी विभाग, वन विभाग, पंचायत समिती यासह इतर शासकीय कार्यालयांचा सहभाग असणार असुन अधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111