shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आज लुमेवाडी येथे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ८ कोटी २० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांची भूमिपूजन व उद्घाटन

आज लुमेवाडी येथे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ८ कोटी २० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांची भूमिपूजन व उद्घाटन

इंदापूर: 

लुमेवाडी (ता.इंदापूर) येथे आज रविवार (दि. ११ फेब्रुवारी) रोजी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ८ कोटी २० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन पार पडणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर असणार आहेत. आमदार भरणे यांच्या प्रयत्नातून मंजूर विकास निधीतून लुमेवाडी या भागातील रखडलेली कामे मार्गी लागली आहेत. चांगल्या दर्जाचे रस्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे आसपासच्या गावांना सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. या निमित्ताने सायंकाळी ६:३० वा जाहीर सभा आयोजित केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी सांगितले.

यावेळी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मधुकर भरणे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, माजी सभापती प्रशांत पाटील,  माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, कार्याध्यक्ष अतुल झगडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकाळ, आता घोगरे माजी सरपंच श्रीकांत बोडके युवा नेते दिपक जाधव, युवा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शुभम निंबाळकर, सोशल मीडिया प्रमुख हमा पाटील, व इतर अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

या विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन लुमेवाडी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व समस्त ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात आले आहे















close