shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इच्छाशक्ती प्रबळ ठेवली तर मार्ग आपोआप सापडतो- आमदार दत्तात्रय भरणे.

इच्छाशक्ती प्रबळ ठेवली तर मार्ग आपोआप सापडतो- आमदार दत्तात्रय भरणे.

आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिला श्री काळभैरवनाथ विद्यालय कळाशीच्या इमारतीसाठी ४५ लाख रुपयांचा निधी.

इंदापूर: विद्यार्थ्यांना एकच सांगायचा आहे की ,तुमची ध्येय फिक्स करा. आपली इच्छा शक्ती प्रबळ ठेवा जर आपण आपली इच्छाशक्ती प्रबळ ठेवली तर मार्ग आपोआप सापडतो असे दि. १० फेब्रुवारी रोजी कळाशी (ता. इंदापूर ) येथील  विकास कामाचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यांनी यानंतर श्री काळभैरवनाथ विद्यालय कळाशी च्या स्नेहसंमेलन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार दत्तात्रय भरणे यांनी म्हटले.

 यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकळ ,युवा नेते दीपक जाधव, तालुका प्रवक्ते संदेश देवकर, राजेंद्र गोलांडे प्रशांत गलांडे ,अमर गाडे ,गजानन गवळी ,स्वप्नील राऊत, सरपंच रूपालीताई गोलांडे, उपसरपंच विजय रेडके, शंकर करे, सतीश चव्हाण, संतोष लोखंडे, शिवाजी भोई, संतोष देवमाने ,धनाजी चव्हाण, हनुमंत बाबर, दादासाहेब भालेकर, अविनाश सूर्यवंशी, सहदेव करे ,अतुल रेडके ,आजिनाथ रेडके, मोहन भोई, अंकुश शिंदे, विलास गोलांडे, बबन रेडके, बबन करे, नामदेव रेडके, गोलांडे, शेख, चंद्रकांत देवकर, धनाजी करे, दत्तात्रय रेडके, गोकुळ गोलांडे , महादेव सूर्यवंशी, विनोद शिंदे, पोपट लोखंडे,विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी व इतर मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले,विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आज कळाशी येथे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की, आयुष्यात जन्माला आल्यानंतर कोणी आईच्या पोटातून शिकून येत नाही .त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. खूप मेहनत करावी लागते. आपल्याला पुढे यशस्वी व्हायचे असेल तर निश्चित प्रकारे  प्रयत्नांचे अवलंबन केले पाहिजे. आजचा कार्यक्रम हा स्नेहसंमेलनाचा व आपल्या शाळेच्या वर्ग खोल्याच्या भूमिपूजनाचा आहे.
या शाळेच्या संस्थेचे चव्हाण सर यांनी ज्यावेळी माझ्याकडे पत्र दिले होते. त्यावेळी मामा त्यांना कळलेच नव्हते. परंतु या शाळेच्या व तुमच्यासाठी ४५ लाख रुपयांचा निधी इमारतीसाठी उपलब्ध करून दिला आहे. येथे माझ्या घरातील मुलगा, मुलगी शिकणार नाही. परंतु ग्रामीण भागात चांगल्या प्रकारे शिक्षणाची सोय झाली पाहिजे. चांगल्या प्रकारच्या वर्ग खोल्या, चांगल्या प्रकारचे टॉयलेट ब्लॉक येथे माझ्या विद्यार्थ्यांसाठी निर्माण झाले पाहिजे. त्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी येथे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. किती काही झालं तरी कळाशी गावावर माझं प्रेम आहे .

तसेच ते पुढे म्हणाले की,तुम्हाला पूर्वी इंदापूरला जाताना तुमच्या रोडची काय अवस्था होती. आजचे रोड पहा व पूर्वीचे रोड पहा याचा फक्त विचार करा .माझ्यासारखा कार्यकर्ता इंदापूर तालुक्याचा आमदार म्हणून काम करतोय. गेल्या अडीच वर्षांपूर्वी राज्याचा राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली होती .अडीच वर्षे मधील पावणे दोन वर्ष कोरोणाच्या काळामध्ये गेले. सहा ते सात महिने काम करायला मिळाले. आपल्या आयुष्यात प्रत्येकाला संधी मिळते. त्या संधीचे सोने कसे करता येईल. संधीच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब माणसाला कशी मदत करता येईल.ते करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनीच केला पाहिजे. निश्चित प्रकारे गेली साडेचार सव्वाचार वर्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी  तालुक्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला आहे. अडचणी तुम्हाला पण असतात .पण अडचणीतून मार्ग काढून पुढे जायचे असते .आयुष्यामध्ये पुढील माणसाला आनंदी समाधानी ठेवता येईल त्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण कोणाच्या तरी आयुष्यामध्ये वाईट होईल असे कधीच काम करायचे नसते .तुमचे  आई, वडील ,मोठा भाऊ बहीण, शिक्षक शिक्षिका हे आपले निश्चितच गुरु आहेत .आपल्या प्रत्येक आई-वडिलांना वाटतं की आमच्या वाटेला जे दुःख आलं आमच्या वाटेला ज्या अडचणी आल्या ते आमच्या मुलाच्या मुलीच्या वाटेला येऊ नये. हे प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते म्हणून तुमच्या आयुष्यात विद्यार्थी म्हणून एकच सांगायचे आहे. कधी आई-वडिलांची मन दुखवू नका. तुमच्यावर रागावतील परंतु यात तुमचे हितच असते. आई वडील आजी आजोबा यांना आयुष्यात कधी दुखवू नका .या लोकांचा मान सन्मान करा .या निमित्ताने मी सांगतो ज्यावेळेस आई वडील आजी आजोबा आपल्यापासून दूर जातात त्यावेळेस त्यांचे महत्त्व कळते. त्यामुळे त्यांचा सन्मान राखा.  नेहमी लक्षात ठेवा पालकांनाही सांगतो तुम्ही तुमच्या मुला-मुलींना सांगा की, तुम्हाला काय व्हायचंय. तुम्ही अभ्यास नाही केला तर तुम्हाला गावातच थांबावे लागेल. तुम्ही जर मेहनत केली तर तुम्ही चांगल्या ठिकाणी जाल. हे तुम्ही ठरवा. तुम्ही खूप अभ्यास करा. खूप खेळा .खूप मेहनत करा. तुमचे आई-वडील कुटुंब शाळेचे शिक्षकाचे यांचे नाव मोठे करा. कदाचित एका शाळेला एका आमदाराचा जिल्ह्यामध्ये एवढा निधी जास्त दिला आहे. त्यामुळे तुमच्या शिक्षकांचा आई-वडिलांचा सगळ्यांचा मान राखा आणि थोडी जागा स्टेज वरील मान्यवरासह या मामाला ही विसरू नका अशी विनंती ही यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी केली.
 काळाशी गावाला सरपंच ,उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य चांगल्या प्रकारचे मिळाले आहेत. भविष्यामध्ये या ठिकाणी चांगले काम आपल्याला करायचे आहे. आणि या कार्यक्रमाला आमदार या नात्याने तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो.

यावेळी राजेंद्र गोलांडे आपल्या मनोगतात म्हणाले की,
आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून श्री काळभैरवनाथ शिक्षण संस्था संचलित श्री काळभैरवनाथ विद्यालय कळाशी च्या इमारतीसाठी निधी उपलब्ध झाला असून त्याचे भूमिपूजन  व स्नेहसंमेलनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते  संपन्न झाले. विद्यालयातील मुलांना बसण्यासाठी जागा नव्हती. शिक्षणाच्या बाबतीत मामा तुमचे खरच प्रेम आहे. आम्ही वारंवार केलेल्या मागणी पूर्ण केली. मी काळाशी गावकऱ्यांच्या वतीने खूपच ऋणी आहे. तुम्ही नेहमीच कळाशी गावासाठी काहीतरी देत असता. जवळजवळ पाच कोटी रुपये च्या कामाच्या मागणीचे पत्र आपणास देण्यात आले असून आपल्या पद्धतीने ते करावी अशा पद्धतीची विनंती त्यांनी केली.
----------------------------------------
चौकट: 
सौ रूपालीताई राजेंद्र गोलांडे यांचा राजश्री शाहू महाराज आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार दत्तात्रय भरणे यांनी केला सत्कार.
 

राजश्री शाहू महाराज आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ रूपालीताई  राजेंद्र गोलांडे आमदार दत्तात्रय यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपसरपंच विजय रेडके यांचाही सन्मान करण्यात आला.
close