shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

क्रांती नगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त बैठक संपन्न..!!

             
प्रकाश मुंडे /बीड जिल्हा प्रतिनिधी :-                                  केज शहरातील क्रांती नगर भागात दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बैठक संपन्न झाली.या बैठकीसाठी क्रांती नगर भागातील समाज बांधव व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करून मिरवणूक भव्य दिव्य पद्धतीने साजरी करण्याच्या माणस सर्वच युवकांनी एकत्र येऊन व्यक्त केला.यावेळी सर्वानुमते पुढील कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.
अध्यक्ष: अशोक शिंदे
उपाध्यक्ष: धिरज कांबळे 
सचिव : किरण मुजमुले 
कोषाध्यक्ष : अनिकेत कस्बे
सहसचिव : आकाश चांदणे
सल्लागार  : नगरसेवक अझहर ( भय्या ) इनामदार , संतोष लांडगे , लक्ष्मण भाऊ जाधव,शकील भय्या सय्यद , , महादेव लांडगे .


सदस्य : KMM बॉईज मित्र परिवार . यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस देखील क्रांती नगर भागातील जयंतीचे अध्यक्ष व सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले अशोक शिंदे यांनी व्यक्त केला. 
नगराध्यक्ष अझहर भाई इनामदार व लक्ष्मण भाऊ जाधव यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
close