*"धागा कृतज्ञतेचा मातृभूमीच्या रक्षणाचा" या उपक्रमांतर्गत विद्यालयातील मुलींनी बनवल्या सीमेवरील सैनिकांसाठी राखी व शुभेच्छा पत्र*
इंदापूर: लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालय बोराटवाडी मध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही उपक्रमाचे ११ वर्षे पुर्ण करत शाळेतील मुलींनी स्वतः बनवलेल्या ९०० राखी.*
*नवनिर्मितीचा, स्वनिर्मितीच्या आनंदा बरोबरच विद्यार्थ्यांत राष्ट्रभुमिच्या प्रती जागृती निर्माण व्हावी यासाठी सीमेवर देशाची अहोरात्र सेवा करणाऱ्या जवानांकरिता २५१ राखी व १०० शुभेच्छा पत्र 'सैनिक मित्र परिवार पुणे' यांच्या माध्यमातून पाठवण्यात आले.*
*संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी राखीची पहाणी केली व विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.*
*विद्यालयातील रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात मुलींनी बनवलेल्या राखी मुलांना बांधण्यात आल्या.* *या उपक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री.भीमराव आवारे सर यांच्या प्रेरणेतून सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.अमर निलाखे सर, श्री.नवनाथ कुंभार सर,श्री.सचिन भुजबळ सर व सौ.मनिषा गायकवाड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.*

