एन .ई .एस .हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर येथील १९ वर्षे वयोगटातील तालुकास्तरीय मुलींचा कब्बडी संघ विजय
इंदापूर:निमसाखर एज्युकेशन सोसायटीचे एन .ई .एस .हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील १९ वर्षे वयोगटातील तालुकास्तरीय मुलींचा कब्बडी संघ विजय झाला. क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व एस .बी .स्पोर्ट्स अकॅडमी पळसदेव यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी एन .ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर विरुद्ध पळसनाथ विद्यालय पळसदेव यांच्या मध्ये 19 वर्षे वयोगटातील मुलींचा कबड्डी सामना झाला त्यावेळी निमसाखर कनिष्ठ महाविद्यालयाने विजय मिळवून त्यांच्या संघाची जिल्हा पातळीवर निवड झाली आहे. त्यावेळी इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार दत्तात्रय मामा भरणे, माजी बांधकाम सभापती प्रवीण भैया माने जय भगवानगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत ढोले या मान्यवरांच्या हस्ते संघाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी त्याने दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुमार सूर्यकांत रणवरे, संस्था सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे , यशवंत विविध कार्यकारी विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन नंदकुमार सूर्यकांत रणवरे यांनी सर्व यशस्वी खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनपूर्वक अभिनंदन केले. मार्गदर्शक शिक्षक म्हणून वैभव नारायण हणमंते सर, सिकंदर मुलानी सर व प्रमोद चव्हाण सर, सौ सोनाली शेंडे मॅडम, दत्तात्रय ढोबळे सर यांनी खूप परिश्रम व प्रयत्न केले. विद्यालयाचे पर्यवेक्षक मधुकर शंकर खरात सर ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत बलभीम बोंद्रे यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले. यावेळी नक्कीच हा गट जिल्हा पातळीवर यश मिळेल असा विश्वास विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत गोपाळराव रणवरे यांनी व्यक्त केला. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे मनोधैर्य वाढविण्यासाठी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

