श्रीरामपूर / प्रतिनिधी:
 दूध दराबाबतचा दुग्धविकास मंत्रालयाने ५ जुलै २०२४ रोजी शासन निर्णय केला. त्यामध्ये १जुलै २०२४  पासून ३० रुपये प्रति लिटर ३/५ फॅट व ८/५ एस एन एफ साठी बंधनकारक केले होते परंतु जिल्ह्यातील सर्वच दूध संघांनी एक ते १० जुलै पर्यंत जुन्यादराने दूध उत्पादकांना दर दिल्याने शेतकरी संघटनेने अहमदनगरचे जिल्हा दुग्धविकास अधिकारी गिरीश सोनवणे यांना घेराव घालून सदर दर देण्यास दूध संघांना भाग पाडले.  


         जिल्ह्यात सर्वाधिक मोठा दूध संघ प्रभात अर्थात सन फ्रेश ऍग्रो याही कंपनीने जुन्या दराने पेमेंट केले परंतु सदर आंदोलनानंतर सन फ्रेश ऍग्रो नी ३० जुलै च्या आत आम्ही सदर फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करू असे लेखी दिले त्याप्रमाणे सन फ्रेश ऍग्रो लिमिटेड श्रीरामपूर यांनी सदर फरकाची तीन रुपये रक्कम दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
   राज्यात गेल्या दीड वर्षापासून पडलेल्या दुध दर समस्येमुळे अहमदनगर जिल्हा शेतकरी संघटनेने ऍड अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली हरेगाव फाटा येथून रास्ता रोको आंदोलनाची सुरुवात केली होती.
दुधाच्या दराचा प्रश्न ज्वलंत असल्याने या आंदोलनाची धग जिल्ह्यासह राज्यभर पसरली होती. दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सदर अध्यादेश काढून दूध उत्पादकांचे तात्पुरते समाधान केले आहे.
      वास्तविक याबाबत केंद्र शासनाने एम एस पी कायदा लागू करणे आवश्यक आहे. तसेच दूध संकलन करणाऱ्या दूध संकलन केंद्रांच्या नोंदी घेऊन त्यांना वजन काटे फॅट मशीन दुग्धविकास अधिकाऱ्यांनी सर्टिफाईड व सील करून दिल्या पाहिजे. यामध्ये दूध तपासणीसाठी   सर्टिफाईड मशीन नसल्यामुळे दूध संकलन केंद्र ते दूध संघापर्यंत मोठ्या प्रमाणात फॅट्सचे पॉईंट कमी दर्शविण्याचा प्रकार होत आहे. दुग्ध विकास मंत्रालयाकडून याबाबतचे कुठलेही नियंत्रण होताना दिसत नाही. दूध संकलनामध्ये पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने व चांगल्या प्रतीचे दूध शहरी ग्राहकांना पुरवठा करण्याच्या दृष्टीने दूध भेसळीवरही नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. वास्तविक आज रोजी चारा गाईंच्या किमती, पशुखाद्य, औषधे याबाबतचा खर्च गेल्या बारा वर्षाच्या तुलनेत सहा पटीने वाढलेला आहे परंतु त्या प्रमाणात दुधाचे दर वाढलेले नाही. तसेच राज्य शासनाने जाहीर केलेले अनुदान प्रतिलिटर पाच रुपये अद्यापही जिल्ह्यातील कुठल्याही दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेले नाही. तसेच सन फ्रेश ऍग्रो लिमिटेड व्यतिरिक्त जिल्ह्यातील बहुतांश दूध संघानी १ जुलै २०२४  ते  १० जुलै २०२४ पर्यंतचा प्रति लिटर ३/- रुपये फरक दिलेला नाही याबाबतही शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा दुग्धविकास अधिकारी यांचे कडे लेखी तक्रार केलेली आहे.

      सदर तक्रारीवर शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष युवराज जगताप, साहेबराव चोरमल, डॉ. दादासाहेब आदिक, डॉ. विकास नवले, प्रभाकर कांबळे, अशोक काळे, नरेंद्र काळे, किरण लंगे, कचरू महाकळे, बाबासाहेब नागवडे, नारायण टेकाळे, सागर गिऱ्हे , अनिल रोकडे, सतीश नाईक, प्रकाश ताके आदि शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सह्या आहे. जाऊ दूध उत्पादक शेतकऱ्यांना १ जुलै २०२४ ते १० जुलै २०२४ पर्यंत जुन्याच दराने पेमेंट मिळालेली आहे अशा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हा दुग्धविकास अधिकाऱ्यांकडे अथवा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडे याबाबतच्या तक्रारी कराव्यात असे आव्हानही या प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात येत आहे.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे, शिरसगाव 
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर -९५६११७४१११