*पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीचे निवडणूकीत जोरदार यश संपादन
वजीर शेख/ पाथर्डी
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या फेरीवाला धोरणानुसार पाथर्डी नगरपालिकेच्या शहर पथविक्रेता समितीची दि.२३ /०८/ २०२४ रोजी प्रथमच निवडणूक झाली, ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली या निवडणुकीकडे शहरवासियांचे यांचे लक्ष लागले होते, या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने ८ पैकी ४ जागांवर विजय मिळवून जोरदार यश प्राप्त केले.
राजू नामदेव पाचरणे , अफरोज अल्ताफ बागवान , तनवीर शफिक आतार, श्रीमती हसीना बाबा आतार यांनी या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे वतीने विजय मिळवला.पाथर्डी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नासीर शहानवाज शेख यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली.
यावेळी नासिर शेख म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, आमचे नेते काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सीडब्ल्यूसी सदस्य बाळासाहेब थोरात, काँग्रेस अहमदनगर जिल्हाध्यक्ष जयंतराव वाघ यांचे नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढविली व विजय मिळवला.या यशाचे श्रेय सर्व फेरीवाले मतदार, उमेदवार व पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना जाते, काँग्रेस पक्षाचे वतीने आम्ही शहरातील छोटे व्यवसायिक व फेरीवाले यांच्यासाठी आवाज उठवला वेळोवेळी आंदोलने केली, याचे फलित म्हणजे या फेरीवाल्यांना केंद्र सरकारच्या फेरीवाला धोरणानुसार प्रमाणपत्र, रजिस्ट्रेशन क्रमांक व बॅच लायसन सर्व मंजूर झाले असून, यावेळी प्रथमच कमिटी स्थापन होण्यासाठी निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून आम्ही प्रयत्न केले आणि त्यात विजय मिळवला
या कमिटी च्या माध्यमातून आम्ही फेरीवाल्यांचे प्रश्न सोडविणे, तसेच छोटे छोटे व्यावसायिक व हातगाडीवाले यांच्या व्यवसायाचा प्रश्न सोडवणे, शहरातील व्यापार व व्यवसाय यामध्ये वाढ होण्यासाठीचा प्रश्न सोडवणे व शहराच्या विकासामध्ये योगदान देणे या बाबींना प्रथम प्राधान्य देणार असून सर्वांचे सहकार्याने प्रयत्न केले जातील ,
यावेळी विजय उमेदवारांचा सत्कार करण्यात आला, पाथर्डी तालुका काँग्रेस अध्यक्ष नासिर शहानवाज शेख , काँग्रेस तालुका अध्यक्ष किशोर डांगे सर, काँग्रेस तालुका अध्यक्ष राहुल ढाकणे सामाजिक कार्यकर्ते फारुख भाई शेख , सामाजिक कार्यकर्ते करीमभाई शेख, युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस जुनेद पठाण, अक्रम भाई आतार, मुन्ना शेख , अल्पसंख्यांक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष जब्बार आतार, रफिक भाई शेख , मुनीर शेख,बशीर शेख, शाहरुख बागवान ,इलियास बागवान, जावेद पिंजारी , भैय्या बागवान , आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
विजयी उमेदवार व त्यांना पाडलेली मतदान पुढील प्रमाणे - १) राजु नामदेव पाचरणे - १२६ मतदान, २) तनवीर शफीक आतार ९९ मतदान, ३) अफरोज अल्ताफ बागवान ९२ मतदान ४) श्रीमती हसीना बाबा आतार यांची बिनविरोध निवड झाली आहे.
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर -९५६११७४१११

