shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवज्योती महिला मंडळ , पी.व्हि .जी कॉलेज यांच्या वतीने अवयव दान श्रेष्ठदान कार्यक्रम संपन्न


एक जण ८ परिवाराला जीवनदान देऊ शकतो - -
डाॅ. महेश मांगुलकर 

प्रतिनिधी : शितल जैन

नाशिक : नवज्योती महिला मंडळ व पी.व्हि .जी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने 'अवयव दान श्रेष्ठदान ' या कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले . हा कार्यक्रम पी. व्हि. जी कॉलेजच्या सेमिनार हाॅलमध्ये घेण्यात आला. .या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डाॅ. महेश मांगुलकर हे होते. डाॅ. अनिल बिनायके यांच्या सहकार्यामुळे  शूक्रवार दि. ३० ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम पार पडला.कॉलेजचे प्राचार्य डाॅ.संजय वाकचौरे सर आवर्जुन उपस्थित होते .
अवयव दाना बद्दल माहिती सांगताना डाॅ.मांगुलकर सर म्हणाले की , एक जण ८ परिवाराला जीवनदान देऊ शकतो.दुसऱ्याच्या हसण्याचे कारण बना. अवयव दान व त्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच नाशिक मधील विविध हॉस्पिटलची लिस्ट सांगितली जिथे अवयव दान करता येते .तसेच प्रेक्षकांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.
मंडळाच्या अध्यक्ष सौ .अलका फळे यांचे अध्यक्षीय मनोगत झाले . हा कार्यक्रम अवेअरनेससाठी घेण्याचा त्यांचा मानस होता. कार्यक्रमाला मंडळाच्या माजी अध्यक्षा,सदस्य ज्येष्ठ नागरिक व कमिटी मंडळ उपस्थित होते .

या कार्यक्रमाच्या प्रोजेक्ट इन्चार्ज डाॅ. सौ अर्चना थोरात यांनी उत्कृष्ठ सूत्रसंचलन केले .आभार सचिव सौ शितल जैन यांनी केले.
close