रश्मीदिदी बागल यांच्या प्रयत्नांना यश
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ३०/ मध्य रेल्वेच्या करमाळा तालुक्यातील जेऊर स्टेशनवर प्रवाशांच्या सोयीसाठी हुतात्मा इंटरसिटी एक्स्प्रेस व उद्यान एक्स्प्रेस या सुपरफास्ट एक्स्प्रेसना थांबा देण्याबाबत भाजप प्रदेश उपाध्यक्ष व साखर संघ संचालिका रश्मी बागल यांनी मुंबई येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. या निवेदनाची सकारात्मक दखल घेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णवजी यांना जेऊर रेल्वे स्टेशन येथे बागल यांच्या विनंती नुसार दोन्ही एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा अशा स्वरुपाचे पत्र देऊन मागणी केली आहे. रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णवजी यांना दिलेल्या पत्रात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की जेऊर हे सोलापूर रेल्वे विभागातील मध्य रेल्वेचे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. करमाळा तालुकाच नाही तर आसपासच्या इतर जिल्ह्यांतील तालुक्यांमधूनही प्रवासी या रेल्वे स्टेशनवरुन पुणे, मुंबई दौंड, इंदोर, अहमदनगर, बेंगळुरू, चेन्नई, तिरुपती बालाजी इत्यादी ठिकाणी नागरिक, विद्यार्थी रोज ये - जा करतात. प्रवाशांच्या सोयीसाठी व भाजपा प्रदेशउपाध्यक्षा रश्मी बागल यांची मागणी लक्षात घेऊन जेऊर येथे हुतात्मा इंटरसिटी एक्स्प्रेस व उद्यान एक्स्प्रेस या दोन्ही गाड्यांना थांबा देण्याबाबत संबंधित विभागास लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत असे पत्रात नमूद केले आहे.

