प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी!!
स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल येथे तालुकास्तरीय शालेय व्हाॅलीबाॅल स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे अध्यक्ष श्री. अंकुशराव इंगळे यांच्या हस्ते झाले . कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री. कोकीळ सर ,प्रमुख पाहुणे श्री. चाटे सर ,शिक्षण विस्तारधिकारी केज शाळेचे सचिव श्री. गदळे सर उपस्थित होते .यावेळी मेजर ध्यानचंद यांचे प्रतीमेचे पुजन करण्यात आले व राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विनोद गुंड क्रीडा संयोजक यांनी केले .
या कार्यक्रमाला मार्गदर्शन श्री. श्री. चाटे सर व श्री. गदळे सर यांनी केले .वेळी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेळाडूना क्रीडा विषयक व व्हाॅलीबाॅल खेळाविषयी खेळाडूना महिती दिली .यावेळी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शाळेतील खेळाडूचा सत्कार प्रमुख पाहुणेच्या हस्ते करण्यात आला .या स्पर्धला क्रीडा शिक्षक श्री. कोंथबीरे सर, श्री शिंदे सर, श्री. जाधव सर, श्री. ढाकणे सर, श्री. जोगदंड सर श्रीमती गिरी मॅडम,श्रीमती सोनार मॅडम,उपस्थित होते.या स्पर्धेला पंच म्हणून श्री. सोनवणे सर यांनी काम पाहिले .कार्यक्रमाला क्रीडा शिक्षक यांचा सत्कार श्री विनोद गुंड सर क्रीडा संयोजक यांनी केला .या स्पर्धेला तालुक्यातील अनेक शाळेतील खेळाडूनी सहभाग नोंदवला


