shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धरणगाव चे भूमीपुत्र आदर्श कृषी सहाय्यक पुरस्काराने सन्मानित...!!

धरणगाव -- येथील सु.क्ष.म.स.संचालक भास्करराव पवार (मराठे) यांचे सुपुत्र हेमंत भास्करराव पवार (मराठे) यांना पुणे येथील पत्रकार भवन येथे आदर्श कृषी सहाय्यक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

धरणगाव चे भूमीपुत्र आदर्श कृषी सहाय्यक पुरस्काराने सन्मानित...!!

              याबाबत सविस्तर वृत्त असे की, धरणगाव चे सुपुत्र हेमंत भास्करराव पवार (मराठे) सहाय्यक कृषी अधिकारी वेल्हा (राजगड) पुणे यांना नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य आयोजित "राज्यस्तरीय नालंदा ग्राम समृद्धी राज्यस्तरीय आदर्श कृषी सहाय्यक पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले. पुणे येथील पत्रकार भवनात हा दिमाखदार पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सचिन अरुण अनंतकवळस (प्रशासन अधिकारी तथा योजना अधिकारी संचालनालाय महाराष्ट्र राज्य पुणे), जितेंद्र तुळशीराम दाते (चेअरमन ए. आर. जे. ग्रुप), अनिल कमलाकरराव अयाचित (कृषी आयुक्तालय पुणे से.नि.तंत्र अधिकारी), श्रीकांत जायभाय (आयोजक नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र) आदी मान्यवर उपस्थित होते. सहाय्यक कृषी अधिकारी हेमंत पवार (मराठे) यांच्यावर धरणगाव परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

close