shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जळगाव येथे 27 सप्टेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन.

 जळगाव, दिनांक 23 (जिमाका) :  पोस्टाच्या ज्या कामांसंबंधीच्या ज्या तक्रारींचे निराकरण सहा आठवड्यांच्या आत झालेले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव येथे दि. 27 सप्टेंबर, 2024 रोजी दुपारी चार वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.

 

जळगाव येथे 27 सप्टेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन

  तरी नागरिकांनी आपल्या तक्रारी संपूर्ण माहितीसह दोन प्रतित अधिक्षक डाकघर कार्यालय, पहिला मजला, हेड पोस्ट ऑफिस बिल्डींग, जळगाव-425001 या पत्त्यावर दि. 24 सप्टेंबर, 2024 पुर्वी पोहोचेल अशाबेताने पाठवावी. मुदतीनंतर आलेल्या तक्रारींचा निपटारा केला जाईल, परंतु डाक अदालतीत समावेश केला जाणार नाही. असे अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 

                                           

close