shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तेजपृथ्वी ग्रुपचा रक्षाबंधन आनंदात साजरा...प्रति वर्षाप्रमाणे कर्तव्यावर असलेले इंदापूर पोलीस स्टेशन येथील पोलीस बांधवांना राखी बांधून अनिताताई खरात यांनी जपली बहिणीची बांधलीकी.

तेजपृथ्वी ग्रुपचा रक्षाबंधन आनंदात साजरा...

प्रति वर्षाप्रमाणे कर्तव्यावर असलेले इंदापूर पोलीस स्टेशन येथील पोलीस बांधवांना राखी बांधून अनिताताई खरात यांनी जपली बहिणीची बांधलीकी.
  इंदापूर : प्रति वर्षाप्रमाणे तेजपृथ्वी ग्रुप तर्फे रक्षाबंधन सण इंदापूर पोलीस स्टेशन येथे आनंदात साजरा केला जात आहे, आज रक्षाबंधन दिवशी इंदापूर पोलीस स्टेशन येथे सर्व पोलीस बांधवांना राखी बांधून अनिताताई खरात यांनी बहिणीची बांधली की जपत कर्तव्यावर असलेले पोलीस बांधव यांचा अतिशय आनंदात  दिवस साजरा केला, 
यावेळी अनिताताई खराब म्हणाल्या की,माझे पोलीस भाऊ कायमच वर्षाचे 365 दिवस आपल्या बहिणीचे रक्षण करतात आणि आज सणासुदिचे सुद्धा त्यांना आपले कर्तव्य बजावत असल्याकारणाने  गावी जाता येत नसल्यामुळे  आम्ही दरवर्षी माझ्या भावांचे आयुष्य वाढवे त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण  व्हाव्यात ते नेहमी निरोगी राहावेत यासाठी आम्ही तेजपृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर रक्षाबंधन सण आनंदात साजरा करतो. आम्ही आमच्या भावांकडून असेच कायम आमचे रक्षण व्हावे त्यांना दीर्घायुष्य मिळावे हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते.
 यावेळी इंदापूर पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ पोलीस निरीक्षक नाळे साहेब, तेजपृथ्वी ग्रुपचे पदाधिकारी तसेच निलेशजी धापटे व इतर मान्यवर उपस्थित होते.
close