shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हर्षवर्धन पाटील यांचे रक्षाबंधन उत्साहात*पाटील कुटुंबात जपला प्रेमाचा आणि संस्कारांचा वारसा

*हर्षवर्धन पाटील यांचे रक्षाबंधन उत्साहात*
पाटील कुटुंबात जपला प्रेमाचा आणि संस्कारांचा वारसा
प्रतिनिधी | इंदापूर : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीचे अध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रक्षाबंधनाचा पवित्र सण भाऊ-बहिणीच्या प्रेमळ आणि भावनिक वातावरणात उत्साहात साजरा केला.
रक्षाबंधनानिमित्त सौ. चित्रा कोरटकर आणि सौ. चेतना मोटे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे औक्षण करून त्यांच्या हातावर प्रेमाचा आणि विश्वासाचा राखीचा धागा बांधला. यावेळी बहिणींनी हर्षवर्धन पाटील यांना निरोगी, आनंदी व दीर्घायुष्य लाभावे, तसेच त्यांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीस अधिक बळ मिळावे, अशी मनोकामना व्यक्त केली.

रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण नसून, भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचा, विश्वासाचा, जिव्हाळ्याचा आणि आयुष्यभर एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याच्या भावनेचा उत्सव आहे. जगातील अनेक नाती स्वार्थाच्या विविध पदरांनी जोडलेली असली, तरी भाऊ-बहिणीचे नाते हे निस्वार्थ प्रेम, आपुलकी आणि विश्वासाने अधिक घट्ट विणलेले असते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

तसेच युवा नेते राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनाही रक्षाबंधनानिमित्त पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. अंकिता पाटील ठाकरे यांनी औक्षण करून राखी बांधली. यावेळी त्यांनी राजवर्धन पाटील यांना प्रेमपूर्वक आशीर्वाद देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने पाटील कुटुंबात प्रेम, आपुलकी, संस्कार आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचे दर्शन घडले.
close