प्रयत्नाचे सार्थक झाले आता संधीचे सोने करण्याचा मानस
सेनगांव/विश्वनाथ देशमुख
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील सुकळी बुद्रुक या ग्रामीण भागातील रहिवासी असलेले विठ्ठल कोंडजी सिरसाठ या शेतकऱ्याच्या सुन श्रुती गौतम हणवते(सिरसाट) हिने पहिल्याच प्रयत्नात पीएचडी पात्र ठरले असल्याने त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
त्यांचे शालेय शिक्षण हे हिंगोली येथीलआदर्श महाविद्यालय येथे झाले असून त्यांनी पहिल्याच प्रयत्नात पीएचडी (PHD) डॉक्टर ऑफ फिलोसोफी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून कौतुकास्पद कामगिरी बजावली असून त्या अत्यंत गरीब व अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातून असून त्यांनी बालपणापासून शैक्षणिक आवड कायम होती त्या अनुषंगाने त्यांनी पहिल्याच प्रयत्नात पीएचडी पात्र परीक्षा ठरले असून.त्यांनी पुढील शिक्षणासाठी व रिसर्च साठी न्यूरोसायन्स(Neuroscience)म्हणजेच (मानवी मेंदूचा अभ्यास) तसेच कॅन्सर सारख्या विषयांमध्ये रुची दाखवली आहे. श्रुती यांचा जन्म हा मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील श्री.गौतम श्रीपती हनवते हे पेशाने टेम्पो चालक आहेत. श्रुती यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे मातोश्री सरलाबाई म्हात्रे विद्यालयात तसेच पदवी मुंबई विद्यापीठातून झालेली आहे. पदव्युत्तर पदवी हे नांदेड विद्यापीठात चालू असून त्यांनी हा पल्ला गाठला आहे.
लहानपणापासूनच त्यांना शिक्षणाची आवड असल्याकारणाने त्यांचा दृष्टिकोन हा संशोधनात्मक रित्या प्रबळ असल्याचे दिसून आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्त्रियांनी आपला शैक्षणिक सहभाग वाढवावा अशी कल्पना त्यांनी स्पष्ट केली आहे. एक मुलगी शिकली तर दोन कुटुंबांना सुशिक्षित होण्याचे रस्ते मोकळे होतात असे त्यांचे मत आहे. त्यांचं हे स्वप्न सत्यात उतरवताना त्यांचे पती श्री अरुण विठ्ठल सिरसाठ यांनी त्यांना भरभरून प्रोत्साहन दिले. त्यांचे सासरे श्री विठ्ठल कोंडी शिरसाट यांचा उल्लेख त्यांनी रिकामा खिसा असलेला जगातील सर्वात श्रीमंत राजामाणूस असा केला आहे. तसेच त्यांच्या या कौतुकास्पद यशाचे श्रेय त्यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिले आहे.तसेच त्यांचे पती श्री अरुण सिरसाट,मोठे भाऊ संदीप शिरसाट, राहुल सिरसाठ, सासू शांताबाई सिरसाठ , शितल सिरसाठ,सासरे विठ्ठल शिरसाट आई शालू हनवते वडील गौतम हणवते तसेच समस्त गावकरी यांना दिले आहे.त्यांच्या या पुढील प्रवासासाठी त्यांना पत्रकार संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष बबन सुतार,तालुका अध्यक्ष जगन्नाथ पुरी,ज्ञानेश्वर कांबळे हत्तेकर अशोक आवारे इत्यादी शुभेच्छा दिल्या असून त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे .


