सेनगांव/विश्वनाथ देशमुख
हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील हाताळा येथे दि.२० फेब्रुवारी गुरुवार रोजी महाबीजच्या वतीने केंद्र पुरस्कृत ग्राम बिजोत्पादन योजने अंतर्गत शेतकरी कडुजी काळे यांच्या शेतावर गव्हु फुले समाधान एमएसिएस ६२२२ व भुईमुग जेए४-२४ पिकाची पाहाणी व शेतकरी प्रशिक्षण मेळावा संपन्न झाला.
या प्रशिक्षण मेळाव्यात प्रथम क्षेत्राची पाहाणी करुन भेसळीची झाडे ओळखणे व रोगट झाडे उपटुन टाकणे तसेच भुईमुगावर रस शोषीत किडीला आळा घालण्याचे सांगण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष धामणकर यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ग्राम बिजोत्पादन करण्याचे आवाहन केले तर कृषी विज्ञान केंद्र तोंडापुरचे वरीष्ठ शास्त्रज्ञ श्री भालेराव यांनी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.
सेनगांव तालुका कृषी अधिकारी वळकुंडे यांनी विविध कृषी योजनेची माहीती दिली तर महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक कुलकर्णी साहेब यांनी महाबीजच्या नवनवीन वाया बद्दल शेतकऱ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.श्री घुले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले तर श्री वाठोरे कृ.शे.अधिकारी यांनी आभार मानले.सेनगांव येथील ओम कृषी केंद्र यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.या कार्यक्रमास मे.माऊली,बळीराजा,गजानन कृषी केंद्र,जयकिसान कृषी केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी प्रमुख मामा कृषी केंद्राचे संचालक नंदलालजी मुंदडा यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी हाताळा,केंद्रा,गोरेगांव,जामठी,पळशी आदी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते



