श्रीरामपूर / प्रतिनिधी:
येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल,स्टेट बोर्डमध्ये मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात संपन्न झाला.
प्रसंगी कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेस विद्यालयाचे प्राचार्य विनोद रोहमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाषणातून त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषा अभिजात कशी झाली याबद्दलची महत्वपूर्ण माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांमधून कु.प्राची निंबाळकर,पुर्वी बडधे, शरयू गाढे,चि.साईराज गायकवाड यांनी तर सहशिक्षकांमधून कुंदा कोतकर, सुप्रिया बाब्रस यांनी मनोगत व्यक्त केले.दरम्यान संगीत शिक्षक दिपक वाघ यांनी मराठी अभिमान गीताचे गायन केले.
यावेळी इ.पहिली ते नववीतील विद्यार्थ्यांच्या मराठी मुळाक्षरे लेखन,दोन व तीन अक्षरी शब्द लेखन,अंक व अक्षर लेखन,
परिच्छेदांचे श्रुतलेखन,सुंदर हस्ताक्षर लेखन,पत्रलेखन इ. लेखन कौशल्यावर आधारित स्पर्धा घेण्यात आल्या व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी विभाग प्रमुख शंकर बाहुले,कुंदा कोतकर,सुप्रिया बाब्रस,साक्षी भणगे यांनी अथक परिश्रम घेतले.
यावेळी कार्यक्रमास विद्यालयाचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई.शेळके,व्हा. चेअरमन डॉ.प्रेरणाताई शिंदे, खजिनदार डॉ.राजीव शिंदे, प्राचार्य विनोद रोहमारे, समन्वयक मंगेश साळुंके,मनिषा उंडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर बाहुले,सूत्रसंचालन कु.अनन्या शिंदे,चि. साईकृष्णा नाईक यांनी केले, तर आभार साक्षी भणगे यांनी मानले.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर -9561174111

