श्रीरामपूर / प्रतिनिधी:
नेतृत्वातून चांगल्या समाजाची निर्मिती होते. नेता हा समाजाचा दिशादर्शक म्हणून काम करत असतो व त्याची पायाभरणी युवा अवस्थेतून होते असे विचार महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. गुंफा कोकाटे यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील बेलापूर येथे महाराष्ट्र शासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित नेतृत्व, वक्तृत्व, अर्ज लेखन व मुलाखत कौशल्य कार्यशाळा प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, नेतृत्व हा समाजाचा आरसा असतो. प्रत्येकामध्ये काही ना काही तरी नेतृत्व गुण असतात मात्र त्याचा वापर विधायक कार्यासाठी केला गेला तर देशाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सदर कार्यशाळा कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करुन एकूण चार सत्रात संपन्न झाली. त्यात अर्ज लेखन कसे करावे? यावर प्रा. डॉ. मनोज तेलोरे, प्रा. गोरख साळवे, प्रा. सुनीता पठारे, प्रा. स्वाती कोळेकर यांनी तर द्वितीय सत्रात...नेतृत्व - विकसित व्यक्तिमत्त्वाची गुरुकिल्ली यावर प्रा. डॉ. बाबासाहेब पवार, प्रा. डॉ. गुंफा कोकाटे, प्रा. डॉ. अशोक माने यांनी, तर तृतीय सत्र....वक्तृत्व- यशस्वी जीवनाचे कौशल्य यावर प्रा. ओंकार मुळे, प्रा. डॉ. बाळासाहेब बाचकर, प्रा. डॉ. गुंफा कोकाटे यांनी, तर चौथे सत्र ....मुलाखत कौशल्य व पेपर कसा लिहावा? यावर प्रा. डॉ. संजय नवाळे, प्रा. रूपाली उंडे, प्रा. डॉ. किशोर गटकळ आदींनी मार्गदर्शन केले.
सदर चर्चा सत्रासाठी प्रा. प्रकाश देशपांडे, प्रा. डॉ. विनायक काळे, प्रा. चंद्रकांत कोतकर, प्रा. अमृता गायकवाड, प्रा. बाबासाहेब पवार, प्रा. डॉ. विठ्ठल सदाफुले, प्रा. अशोक थोरात आदींसह प्राध्यापक, प्राध्यापकेतर सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. विठ्ठल लंगोटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. बाळासाहेब बाचकर यांनी मानले. आणि सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

