shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हास्तरीय सुलभकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणास सुरुवात



श्रीरामपूर / प्रतिनिधी:
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत अहिल्यानगर जिल्ह्याच्या कोपरगांव तालुक्यातील कोकमठाण येथे जिल्हास्तरीय सुलभकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दि.२६ ते २९ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. 


या जिल्हास्तरीय सुलभकांच्या प्रशिक्षणाचे उद्घाटन कोकमठाण येथील आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिव्याख्याते अरुण भांगरे, कैलास सदगीर, डॉ. सदानंद डोंगरे, डॉ. अरविंद सगभोर, प्रकाश पारखे, अनमोल होन यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत रामेश्वर लोटके यांनी केले. या प्रशिक्षणाचा आरंभ राष्ट्रगीत, राज्यगीत आणि प्रार्थनेने झाला. याप्रसंगी कैलास सदगीर व लक्ष्मण सुपे यांनी आपल्या मनोगतातून प्रशिक्षणाचे उद्दिष्ट आणि महत्त्व विशद केले. यावेळी अरुण भांगरे यांनी आपले मनोगतातून सांगितले की, राज्यात २ ते १२ जून या कालावधीत वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाच्या प्रत्येक दिवशी परिपाठ, दृकश्राव्य प्रदर्शन, तासिका आणि स्वाध्यायाचे नियोजन करण्यात आले आहे. दिवसभराच्या चार तासिकांना जोडून १० गुणांची चाचणी व शेवटच्या तासिकेला दहा दिवसात पाच स्वाध्याय घेतली जाणार आहेत. एकूण प्रशिक्षणात ३०० पैकी गुणांचे मूल्यमापन होणार असून प्रशिक्षणार्थीना पास होण्यासाठी किमान ५० टक्के गुण मिळविणे गरजेचे आहे. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी यांची ऑफलाईन व ऑनलाईन हजेरी महत्त्वाची असून ही हजेरी प्रत्येक तासानंतर घेतली जाणार आहे. प्रशिक्षण संपल्यानंतर ४० दिवसांपर्यंत प्रशिक्षणार्थी यांच्याकडून पाच स्वाध्याय/ प्रकल्प नवोपक्रम/ कृती संशोधन अहवाल जमा करून घेतला जाणार आहे. समारोपाच्या दिवशी बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. यावेळी दुपारच्या सत्रामध्ये डॉ. अरविंद सगभोर, डॉ. सदानंद डोंगरे, रामेश्वर लोटके यांच्या तासिका संपन्न झाल्या. या जिल्हास्तरीय प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातून सर्व तालुक्यातून १६८ पेक्षा अधिक सुलभक उपस्थित होते.

*वृत्त विशेष सहयोग
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
close