एरंडोल (ता.२७ मे) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एरंडोल तालुक्यात सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले असून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजयदादा पवार, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष ईश्वरदादा पाटील आणि जिल्हा कार्याध्यक्ष योगेशभाऊ देसले यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान यशस्वीपणे पार पडत आहे.
या अभियानांतर्गत एरंडोल शहरासह विखरण, उमरदे, खर्ची, रवंजा, खडके, पद्मालय, नागधुली, चुटकी, आडगाव, तळई, मालखेडा, विक्रम रोड, भवानीनगर, हनुमान नगर, उत्तमनगर, केवढीपुरा याठिकाणी नोंदणी मोहीम पार पडली.
या वेळी प्रमुख उपस्थिती—
ईश्वरदादा पाटील – जिल्हाध्यक्ष, किसान सेल
अमितदादा पाटील – तालुका अध्यक्ष
डॉ. सुरेशदादा पाटील – माजी नगरसेवक
राजेंद्र चौधरी – तालुका किसान सेल अध्यक्ष
किशोरभाऊ पाटील (खर्ची), मुकुंदभाऊ ठाकूर (विखरण), दिनेश महाजन (रिंगणगाव), मनोज पाटील (रिंगणगाव), सुनील मोरे (खडक खुर्द), प्रदीप सोनवणे, शेख कलीम (एरंडोल), दीपक पाटील (मालखेडा), शेख मुजमबिल, शेख शोएब (कासोदा), जयराम पाटील (उमरदे), सतीश पाटील (खेडी), अभयसिंग पवार (तांडा), कैलास सोनवणे (बामणे), सागर भोई (भवानीनगर), समीर खाटीक (फकीर मोहल्ला), शंकर नाईक (केवढीपुरा), सुनील महाजन (विक्रम रोड), बापू दयाराम महाजन, विक्रांत रोड, रामसिंग पावरा, करण नाईक, उत्तम नाईक (पद्मालय), अर्जुन गायकवाड (तळई), इजाज खाटीक (नांदोली), प्रभाकर नाईक (आडगाव) आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
संपूर्ण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भक्कम विस्तार साधण्यासाठी हे सदस्य नोंदणी अभियान राबवले जात असून, युवकांचा आणि शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभतो आहे. या अभियानामुळे पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात हा उपक्रम पक्षबांधणीसाठी मोलाचा ठरणार आहे.