नगर / प्रतिनिधी:
नगर येथील अलकरम एज्युकेशनल अँड सोशल सोसायटी संचलित अलकरम हॉस्पिटलच्या वतीने अहमदनगर शहराच्या ५३५ व्या स्थापना दिनानिमित्त विविध रक्त व लघवी तपासण्या, सोनोग्राफी, एक्स-रे, प्रसुती तसेच मोफत थायरॉईड आणि यूरिक ॲसिड तपासणी आदी मध्ये रुग्णांना सवलतीत उपचार शिबीराचे मंगळवार दिनांक २७ मे २०२५ रोजी सकाळी १० ते १ वाजे पर्यंत आयोजित करण्यात आले असल्याची माहिती डॉ.अशपाक पटेल यांनी दिली.
या शिबीरामध्ये रक्त व लघवी तपासणी मध्ये ३० ते ५० टक्के सूट, एक्स-रे २०० रुपयात, सोनोग्राफी सर्व तपासण्यावर २० ते ३० टक्के सूट, प्रसूती नॉर्मल ११००० हजार रुपये, सिजेरियन प्रसूती २१ हजार रुपये, फोटोथेरपी मध्ये ३० ते ४० टक्के सूट देण्यात येणार असल्याचे डॉ. जहीर मुजावर यांनी सांगितले.
तरी या शिबिराचं जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी फायदा घ्यावा तथा माहितीसाठी तौफिक तांबोली यांच्याशी 9860708016 / 0241-242 3333 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन शेरअली शेख यांनी केले आहे.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान
अहमदनगर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111