नगर प्रतिनिधी:
शिर्डी साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी कर्मचारी राजेंद्र खर्डे प्रसाद विभागात ड्युटी करत असताना साईभक्त टाटा राव मोबाईल नंबर 9581264657 यांचे प्रसादाचे बिल 810 रुपये झाले होते परंतु टाटा राव यांच्याकडून नजरचुकीने 8010 रुपये ऑनलाईन केले सदर कर्मचाऱ्यांची ड्युटी संपल्यानंतर पैसे वाढत असल्याने ऑनलाईन पैसे चेक केले असता साई भक्ताने 8010 रुपये नजरचुकीने पे केले होते साई भक्ताचे 7200 रुपये जास्त बिल दिले होते त्या साईभक्तांना पैसे परत करण्यात आले. सत्कार संचालक विनोद कोते यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी चेअरमन विठ्ठल तुकाराम पवार पा, व्हा. चेअरमन पोपटराव भास्करराव कोते पा. संचालक महादु बापुसाहेब कांदळकर, कृष्णा नाथा आरणे, भाऊसाहेब चांगदेव कोकाटे पा., संभाजी शिवाजी तुरकणे पा., देविदास विश्वनाथ जगताप, विनोद गोवर्धन कोते पा., मिलींद यशवंत दुनबळे, तुळशिराम रावसाहेब पवार पा., रविंद्र बाबु गायकवाड, भाऊसाहेब लक्ष्मण लवांडे पा., इकबाल फकिरमहंमद तांबोळी, सौ सुनंदा किसन जगताप पा., सौ. लता मधुकर बारसे पा., रंभाजी काशिनाथ गागरे, भाऊसाहेब भानुदास लबडे पा., सचिव विलास गोरखनाथ वाणी पा. सह सचिव बाबासाहेब शंकर अनर्थे पा., सहाय्यक सह सचिव संभाजी सोपान कोते पा. व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

