साईनगरीचा सर्वांगीण विकास हेच ध्येय - नवनिर्वाचित गटनेत्या - सौ. प्रतिक्षा कोते
शिर्डी प्रतिनिधी : (तुषार महाजन)
शिर्डी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीने नगरपरिषदेतील आपली पकड अधिक मजबूत केली आहे. आज झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीत, महायुतीच्या नगरसेवकांच्या गटनेतेपदी नवनिर्वाचित नगरसेविका सौ. प्रतिक्षा किरण कोते यांची एकमताने आणि बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
विखे पाटील कुटुंबाचा विश्वास सार्थ ठरवणार,
महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. कोते कुटुंबाचे पक्षाशी असलेले एकनिष्ठ नाते आणि सौ. प्रतिक्षा कोते यांचा सुसंस्कृत व अभ्यासू चेहरा पाहून पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. गटनेतेपदी एका महिलेला संधी देऊन विखे पाटील गटाने महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
युवा नेतृत्व आणि विकासाची जोड,
सौ. प्रतिक्षा कोते या उच्चशिक्षित असून, त्यांचे पती युवा नेते किरण कोते यांचा जनसंपर्क आणि संघटन कौशल्य शिर्डी शहरात सर्वश्रुत आहे. या दोघांच्या समन्वयातून प्रभागाचा आणि पर्यायाने शहराचा विकास वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. गटनेतेपद मिळाल्यामुळे आता नगरपरिषदेच्या सभागृहात महायुतीची रणनीती ठरवण्याची आणि विकासकामांना गती देण्याची मुख्य सूत्रे सौ. प्रतिक्षा कोते यांच्या हाती असणार आहेत.
निवडीनंतर व्यक्त केला निर्धार,
गटनेतेपदी निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सौ. प्रतिक्षा कोते म्हणाल्या की, नामदार विखे पाटील साहेब आणि सुजयदादांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो मी सार्थ ठरवेन. हे पद म्हणजे केवळ मानसन्मान नसून शिर्डीकरांच्या सेवेची मोठी संधी आहे. शहरातील रस्ते, पाणी आणि स्वच्छता या प्रश्नांवर सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन काम करणे आणि शिर्डीचा कायापालट करणे, हेच माझे उद्दिष्ट राहील.
किरण कोते यांच्या कष्टाचे फळ!
युवा नेते किरण कोते यांनी गेल्या काही वर्षांत शिर्डीत केलेल्या सामाजिक कार्याची आणि जनसंपर्काची ही पोचपावती मानली जात आहे. आपल्या पत्नीच्या माध्यमातून त्यांनी नगरपरिषदेत प्रवेश केला असून, आता 'गटनेतेपद' मिळाल्याने त्यांच्या कामाला प्रशासकीय बळ मिळणार आहे. या निवडीमुळे कोते समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
अभिनंदनाचा वर्षाव:
सौ. प्रतिक्षा कोते यांच्या निवडीचे वृत्त समजताच शिर्डी शहरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील, तसेच भाजप-महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि शिर्डी ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
📢 बातम्या | जाहिराती | विशेष लेख
✍🏻 पत्रकार: तुषार महाजन
📞 मोबाईल: 7666675370
⭕ “महाराष्ट्राचा” – लोकांचा आवाज, जनतेचा विश्वास!

