शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा अहिल्यानगर प्रतिनिधी,
दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार ता. २३/१२/२०२५
राहुरी (वांबोरी) : राहुरी तालुक्यातील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वांबोरी येथे शनिवार, डिसेंबर २०२५ रोजी डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे यांची जयंती, राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना अभिवादन करण्यात आले. तसेच शालेय वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचा कार्यक्रम देखील उत्साहात संपन्न झाला.
कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित डॉ. बाबुराव बा. तनपुरे जयंती, गाडगे महाराज पुण्यतिथी व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी मान्यवर.
(छाया : दिपक हरिश्चंद्रे)
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. अंचलाताई झंवर या होत्या, प्रमुख उपस्थितीत गोरक्षनाथ दुधाडे व आण्णासाहेब कोरके यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य सोन्याबापू कल्हापुरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. वाळके, शिक्षिका जगताप व डौले यांनी संयुक्तपणे केले.
यावेळी माध्यमिक शिक्षक प्रतिनिधी ढालमारे, उच्च माध्यमिक शिक्षक प्रतिनिधी कुमावत, शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी संतोष तेलोरे यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. घाडगे यांनी मानले.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (आहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

