shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रामनगरमध्ये कमळाचा नवा अंकुर!प्रभाग १४ मधून वडार समाजाच्या संघर्षातून उभा राहणारा तरुण चेहरा – लखन पाटकर

पिंपरी–चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांचा बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक १४, रामनगर येथे राजकीय वातावरण तापू लागले असून, सर्वसामान्य जनतेत एका नव्या, तरुण, अभ्यासू व जमिनीवर काम करणाऱ्या उमेदवाराची जोरदार चर्चा सुरू आहे. हा चेहरा म्हणजे भारतीय जनता पार्टीकडून ओबीसी (अ) प्रवर्गातून इच्छुक असलेले श्री. लखन हरिश्चंद्र पाटकर.



चार पिढ्यांपासून रामनगर परिसरात वास्तव्यास असलेले, वडार समाजातील खाण कामगाराचे सुपुत्र असलेले लखन पाटकर हे केवळ नाव नाही, तर संघर्ष, श्रम, अभ्यास आणि समाजजाणिवेचे प्रतीक बनले आहेत. आजही या परिसरात ३,००० ते ३,५०० वडार समाजाची लोकसंख्या असून, ग्रामपंचायत काळात कै. राजाराम लष्करे यांच्यासारखे सरपंच समाजातून पुढे आले होते.

🏗️ पिंपरी–चिंचवडच्या विकासात वडार समाजाचा मोलाचा वाटा

१ ऑगस्ट १९६२ रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (MIDC) स्थापना झाली आणि पिंपरी–चिंचवड हा औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा भाग ठरला. मात्र त्या औद्योगिकीकरणाची पायाभरणी करणारे रस्ते, दगडखाणी, कंपनीचे पाया, सिमभिंती, पाणीपुरवठा व्यवस्था या जड कामांची जबाबदारी रामनगर, विद्यानगर, संभाजीनगर, शाहूनगर, चिखली, मोशी येथील वडार समाजाने आपल्या घामाने पूर्णत्वास नेली.

कामगार नगरी म्हणून ओळख निर्माण होत असतानाच, या समाजाच्या पुनर्वसनासाठी भूखंड राखीव ठेवण्यात आले. मात्र, महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर शिक्षण, आरोग्य, दर्जेदार घरे याऐवजी राजकीय उदासीनतेमुळे या समाजावर “झोपडपट्टी”चा शिक्का मारण्यात आला. दगडखाणी बंद झाल्या, रोजगार गेला, व्यसनाधीनता वाढली; पण शहर विकसित झाले, समाज मात्र मागेच राहिला.

📚 अभ्यासू तरुण नेतृत्व – लखन पाटकर

अशा परिस्थितीत राज्यशास्त्राचा अभ्यास असलेले, राजकीय समीकरणे समजून घेणारे, तरुण व चाणाक्ष नेतृत्व म्हणून लखन पाटकर पुढे येत आहेत. त्यांना “राजकारणातील वजीर” असेही संबोधले जाते.
ते वडार मजूर शिल्प प्रतिष्ठानचे सचिव असून, पिंपरी शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. वाचन, लेखन, नागरी प्रश्नांचे ज्ञान हे त्यांचे बलस्थान आहे.

रस्ते, फुटपाथ, ड्रेनेज, गटारे, स्टॉर्म वॉटर लाईन यांसारख्या महानगरपालिका पायाभूत सुविधांचे सखोल ज्ञान असलेले ते उमेदवार आहेत.

🚺👩‍🎓 महिला, तरुण आणि संस्कृती केंद्रस्थानी

निवडून आल्यास प्रभागात –

  • महिला सबलीकरणासाठी विशेष योजना,
  • तरुणांना व्यसनमुक्त ठेवण्यासाठी रोजगार निर्मिती, शिक्षण व औद्योगिक प्रशिक्षण,
  • मेट्रो स्टेशन परिसरात रिक्षाचालकांसाठी आरामगृहे, भोजन व्यवस्था व सुसज्ज स्नानगृहे,
  • मुलभूत नागरी सुविधा शंभर टक्के उपलब्ध करून देणे,
  • समाजमंदिरे, बौद्ध विहार यांचे आधुनिक सुशोभीकरण,
  • सण–उत्सवांमध्ये मोठ्या साऊंड सिस्टिमऐवजी वंशी, वीणा, मृदंग, डमरू, ढोल, लेझीम व विविध राज्यांतील पारंपरिक वाद्यांचे प्रशिक्षण एकाच छताखाली देऊन रोजगार निर्मिती,
  • प्रभागातील मराठी माध्यमाच्या शाळा सेमी व इंग्रजी माध्यमात रूपांतर,
  • “झोपडपट्टी” व “स्लॅम” हे शब्द हटवून “छत्रपती शाहू महाराज मध्यमवर्गीय पुनर्वसन विभाग” असे नामकरण करण्यासाठी पाठपुरावा –
    असे ठोस नियोजन त्यांनी मांडले आहे.

रामनगरचा सूर स्पष्ट

आज रामनगरमधील सर्वसामान्य जनता, तरुण वर्ग, महिला, समाजसेवक एकमुखाने म्हणत आहेत की,

“पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेत खऱ्या अर्थाने अभ्यासू, संघर्षातून आलेले, वडार समाजाचे शिलेदार श्री. लखन हरिश्चंद्र पाटकर हेच जनसेवक झाले पाहिजेत.”

प्रभाग १४ मध्ये कमळाचा हा नवा अंकुर आगामी निवडणुकीत कोणती उंची गाठतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. 🪷

000

close