shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डोंबिवलीत चि. सृष्टी प्रशांत सोनार यांचा २३ वा वाढदिवस उत्साहात संपन्न डॉ. देवेंद्रनाथ दुसाने यांच्यासह परिवारातील सदस्यांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळा

शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
न्याहाळोद येथील रहिवासी चि. सृष्टी प्रशांत सोनार यांचा २३ वा वाढदिवस मंगळवार, दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी त्यांच्या राहत्या घरी मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि आप्तेष्टांनी चि. सृष्टी यांना उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
विना औषधाचे आजार बरे करणारे या घरगुती परंतु दिमाखदार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण येथील प्रसिद्ध व्यक्तिमत्व डॉ. देवेंद्रनाथ दगडूशेठ ओंकार दुसाने +919004603595 कल्याण जि.ठाणे उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते आणि वडील श्री. प्रशांत बद्रीनाथ सोनार व आई सौ. वैशाली प्रशांत सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून हा आनंद साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सृष्टी यांचे बंधू श्री. साहिल प्रशांत सोनार, सुनबाई सौ. शमिका साहिल सोनार आणि कुटुंबातील सर्वात लहान सदस्य चि. साहिका साहिल सोनार यांनी वाढदिवसाच्या सोहळ्यात विशेष सहभाग नोंदवला. डॉ. दुसाने यांनी यावेळी बोलताना चि. सृष्टी यांना भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शन करत शुभाशीर्वाद दिले.
सोनार कुटुंबियांच्या राहत्या घरी पार पडलेल्या या कार्यक्रमात स्नेहमेळाव्याचे आणि आनंदाचे वातावरण होते. उपस्थित सर्व नातेवाईक आणि स्नेहीजनांनी चि. सृष्टी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
close