shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कृषी पदवीधरांनी अभ्यासली बँकिंग क्षेत्रातील कृषी कर्ज प्रक्रिया; ‘रावे’ (RAWE) उपक्रमांतर्गत बँक भेट संपन्न:*

 कृषी पदवीधरांनी अभ्यासली बँकिंग क्षेत्रातील कृषी कर्ज प्रक्रिया; ‘रावे’ (RAWE) उपक्रमांतर्गत बँक भेट संपन्न:*
इंदापूर: ग्रामीण  जागरूकता कार्यानुभव   कार्यक्रमांतर्गत  रत्नाई कृषी महाविद्यालयातील ‘कृषी कन्या’ विद्यार्थिनींनी दिनांक 16/12/2025 रोजी ICICI BANK ला भेट दिली.यावेळी कृषी शिक्षणात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून प्रत्यक्ष क्षेत्रीय अनुभवाची जोड मिळणे आवश्यक आहे. याच उद्देशाने, कृषी महाविद्यालय अकलूज,येथील कृषी पदवीच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी 'रावे' (RAWE - Rural Agricultural Work Experience) कार्यक्रमांतर्गत ICICI BANK शाखेला भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी शेतीशी संबंधित विविध बँक योजना आणि कर्ज प्रक्रियांचे सखोल ज्ञान आत्मसात केले.बँकेचे शाखा व्यवस्थापक [Branch Manager]यांनी विद्यार्थ्यांना बँकेच्या कामकाजाची माहिती दिली. त्यांनी प्रामुख्याने पीक कर्ज(Crop Loan),किसान क्रेडिट कार्ड (KCC), शेती यांत्रिकीकरणासाठी कर्ज, आणि पशुपालन व कुक्कुटपालनासाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच शासनाच्या कर्ज योजना, कर्ज प्रकिया, डिजिटल बँकिंग यांविषयी माहिती घेतली.  यावेळी कृषीकन्या साक्षी बोराटे, सुनैना जाधव, प्रतीक्षा जाधव, श्रद्धा जाधव, श्रद्धा इंगोले, कीर्ती कोळी,अनामिका कोळेकर, प्राची कोंडलकर, यांनी सहभाग नोंदवला .कार्यक्रमास  शिक्षण प्रसारक  मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. संग्रामसिंह मोहिते पाटील, प्राचार्य आर. जी. नलावडे (प्राचार्य, रत्नाई कृषि महाविद्यालय अकलूज),  प्रा.एस. एम .एकतपुरे (कार्यक्रम समन्वयक) व प्रा.एम. एम. चंदनकर (कार्यक्रम अधिकारी) प्रा  .एच. वी .खराडे मॅडम (कार्यक्रम अधिकारी)यांचे मार्गदर्शन लाभले .
close