*शब्दांपेक्षा कृतीवर भर! कृषीकन्यां कडून प्रत्यक्ष शेतावर ऊसाच्या रासायनिक बेणे प्रक्रियेचे प्रात्यक्षिक.*
इंदापूर: इंदापूर तालुक्यातील बावडा येथे कार्यरत असलेल्या, रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज च्या कृषी कन्यांनी शुक्रवार ( दि.19 डिसेंबर 2025) रोजी 'ग्रामीण कृषी कार्यानुभव' (RAWE) कार्यक्रमांतर्गत परिसरातील शेतकऱ्यांना ऊसाच्या भरघोस उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या 'रासायनिक बेणे प्रक्रियेचे' यशस्वी प्रात्यक्षिक करून दाखवले.ऊसाच्या बेण्याद्वारे पसरणारे रोग आणि जमिनीतील किडींमुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कृषी महाविद्यालय अकलूज येथील कृषी कन्यांनी कंबर कसली आहे. बेणे प्रक्रियेमुळे उगवण क्षमता १५% वाढते, फुटवे जोमदार येतात आणि सुरुवातीचा औषधोपचाराचा खर्च निम्म्याने कमी होतो. कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी सुरुवातीला बेणे प्रक्रिया करणे आवश्यक आहे. यामध्ये बेणे निवड प्रक्रिया, बुरशीनाशक किंवा कीटकनाशक यांचा योग्य प्रमाणात वापर, तसेच बेने प्रक्रियेचे फायदे शेतकऱ्यांना सांगण्यात आले. यावेळी कृषी कन्या कीर्ती कोळी, प्राची कोंडलकर, अनामिका कोळेकर, श्रद्धा जाधव, श्रद्धा इंगोले, प्रतिक्षा जाधव,सुनैना जाधव, साक्षी बोराटे यांनी सहभाग नोंदवला. या उपक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज चे अध्यक्ष संग्राम सिंह मोहिते पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. नलावडे सर, तसेच प्रा.एस. एम. एकतपुरे , प्रा.एम. एम.चंदनकर आणि प्रा. एच. व्ही.खराडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

