शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा अहिल्यानगर प्रतिनिधी,
दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार ता. २३/१२/२०२५
शाहू विद्यालयाच्या प्रांगणामध्ये पेव्हिंग ब्लॉक बसून देण्याचे माजी विद्यार्थ्यां संघाकडून जाहीर...
राहुरी (वांबोरी/खडांबे) : श्री शाहू विद्यालयास आधुनिक शिक्षणासाठी अहिल्यानगर येथील मॅक केअर हॉस्पिटल चे सर्वेसर्वा सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ व खडांबे गावचे भूषण डॉक्टर सोनवणे यांच्या वतीने इंटरॲक्टिव्ह स्मार्ट बोर्ड सप्रेम भेट देण्यात आला. या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल व तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे.
शनिवार दिनांक २० डिसेंबर रोजी डॉक्टर सोनवणे यांनी उपलब्ध करून दिलेल्या स्मार्ट बोर्डचे उद्घाटन समारंभ श्री शाहू विद्यालयात पार पडला याप्रसंगी नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य दीपक दरे हे अध्यक्षस्थानी होते, सुमारे एक लाख दहा हजार रुपये किमतीचा बोर्ड खरोखर विद्यार्थ्यांना खूप उपयुक्त ठरणार आहे. विद्यालयाचे प्राचार्य रायते, व पर्यवेक्षक शिंदे यांनी डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी त्वरित हा बोर्ड विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला.
उद्घाटन प्रसंगी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य दीपक जि दरे यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे लक्ष केंद्रित करावे व स्पर्धा परीक्षांमध्ये कसे यशस्वी व्हावी याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते. डॉक्टर सोनवणे यांनी विद्यार्थ्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून ज्ञानसंपादन करावे असे मोलाचे मार्गदर्शन केले. इंटरॲक्टिव्ह बोर्डच्या माध्यमातून अध्यापन अधिक सोपे, रोचक व प्रभावी होणार असून विशेषतः गणित व विज्ञान विषय समजण्यास मदत होईल, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले. विद्यालयाच्या वतीने डॉक्टर सोनवणे यांचे आभार मानण्यात आले.
यावेळी माजी विद्यार्थी संघाच्या वतीने मैदानावर प्रव्हिंग ब्लॉक बसवून देण्याचे जाहीर करण्यात आले
या कार्यक्रमास पंचायत समिती माजी सभापती बाळासाहेब लटके, कृषीभूषण सरसिंग पवार,माजी सरपंच प्रभाकर हरिश्चंद्रे,माजी सरपंच यशवंत ताकटे,बाळासाहेब जठार,भरत पवार,गुलाबराव पवार, राजकुमार पवार,अर्जुन खळेकर,जॉनी पवार सरपंच अण्णा माळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
या उपक्रमामुळे डिजिटल शिक्षणाकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले असून पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (आहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

