एरंडोल :- आंतरराष्ट्रीय ध्यान दिनाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती एरंडोल येथे श्री भगवती क्लासेस, एरंडोल यांच्या वतीने निशुल्क पिरॅमिड ध्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी आयोजित या कार्यक्रमात ध्यान मास्टर देवयानी कृष्णा महाजन यांनी पिरॅमिड ध्यानाचे महत्त्व विशद करत ध्यानामुळे तणाव, चिंता व नैराश्य कमी होऊन मनाची एकाग्रता वाढते, असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास गट विकास अधिकारी दादाजी एकनाथ जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रतिभा भीमराव सुर्वे, सहाय्यक प्रशासन अधिकारी डी.एस. माळी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी योगेश पाटील यांच्यासह विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंते व पंचायत समितीतील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्यानामुळे दैनंदिन कामकाजात सकारात्मकता वाढते, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


