धरणगाव प्रतिनिधी --येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पद्मविभूषण शरदचंद्र पवार साहेबांच्या 85 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने फळ वाटप, नाश्ता व जेष्ठ व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज 12 डिसेंबर म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, देशाचे माजी केंद्रीय संरक्षण तथा कृषिमंत्री, पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांच्या 85 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने धरणगावात विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप, मुकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना नाश्ता देण्यात आला. त्यानंतर इंदिरा गांधी कन्या विद्यालयात जेष्ठ व्यक्तींचा रुमाल, टोपी व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी कार्यक्रमाचा उद्देश, स्वरूप व महत्व समजावून सांगितले. या सत्कारात हिरामण पंडित जाधव, बिच्छा बापू वैदू, कांतीलाल गणा पवार, नारायण चुनीलाल चव्हाण, धनलाल बुधा महाजन, दत्त्तात्रय शिवदास चौधरी, बबनराव केशव मराठे, दिलीप सुरेश मराठे, रामा मोतीराम धनगर, विठ्ठल शंकर धनगर, अशोक छगन झुंजारराव, उत्तम सोनु धामोळे, भिमराव त्र्यंबक धनगर, भैय्या मासूम पटेल, रघुनाथ साहेबराव पाटील, मधुकर आधार माळी, वासुदेव हरी माळी, जानकीराम झिपरू माळी, गोकुळ जानकीराम माळी आदी जेष्ठ मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना जिल्हा युवक कार्याध्यक्ष मोहीत पवार यांनी पवार साहेबांनी नानाविध घटकांसाठी विशेष करून युवकांसाठी केलेले कार्य सांगितले. सेवानिवृत्त प्रा आर एन भदाणे यांनी यांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितले की, पवार साहेबांनी सर्वात आधी 7/12 कोरा करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक एस डब्ल्यू पाटील सरांनी सांगितले की, कृषी - संरक्षण - साहित्य व विज्ञान - संस्कृती व मनोरंजन - उद्योग - वाणिज्य व व्यापार - कला व क्रीडा इ क्षेत्रात कार्य करणाऱ्या साहेबांनी शतकवीर व्हावे असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, राजेंद्र धनगर, तालुकाध्यक्ष संजय पाटील, जेष्ठ पदाधिकारी प्रा आर एन भदाणे, नारायण नामदेव चौधरी, शहर कार्याध्यक्ष रविंद्र वाघ, माजी सरपंच सोनवद उज्वल पाटील, माजी सरपंच बांभोरी राजू सोनवणे, अँड कैलास मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका कार्याध्यक्ष हितेंद्र पाटील, उपाध्यक्ष रमेश महाजन, भगवान शिंदे, अमित शिंदे, दिनकर पाटील, कोषाध्यक्ष वाल्मिक पाटील, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष खलील (बंटी) खान, युवक तालुकाध्यक्ष परेश गुजर, शहर सचिव नंदू धनगर, उपाध्यक्ष कैलास मराठे, एकनाथ पाटील, जयदीप पाटील, मोहन पाटील सर, युवक शहराध्यक्ष जुनेद बागवान, कार्याध्यक्ष सागर महाले, उपाध्यक्ष सागर चव्हाण, समाधान महाजन, राजिद कुरेशी, प्रसिद्धी प्रमुख रवि महाजन, प्रफुल पवार, साहील खान, गोपाल माळी, अमोल सोनार, राहुल पाटील, दिनेश भदाणे, बब्बू शेख आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी केले.


