shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भाजपा व शिवसेना लालपरी हात दाखवाल तिथे थांबते


ज्येष्ठ पत्रकार .दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

दिलीप मालवणकर 

आगामी निवडणुकीची घंटा गाडी सर्वत्र फिरत आहे. उल्हासनगर महापालिका हद्दीत या घंटा गाडीला  मुख्य वीस थांबे आहेत. त्यात एकूण 78 थांबे आहेत. ही घंटा गाडी काही कालबाह्य लोकप्रतिनिधीना डस्टबिन मध्ये टाकणार आहेत. त्यात ठिकठिकाणची विष्ठा खाणारे डुक्करही असतील. एकंदरीत ही घंटा गाडी शहरात स्वछता मोहीम राबवणार आहे.

शिंदेची शिवसेना व भाड्याने उमेदवार घेणारा भाडोत्री पक्ष  भाजपा लाल परी सारखे आहेत. हात दाखवा आणि गाडी थांबवा आणि लालपरीत बसा, असे हे पक्ष झाले आहेत.  शिव सेना उबाठा ची बस नादुरुस्त झाली आहे व ती कधीच सुरू होणार नाही! असे समजून येथील फिरस्ते लाल परीत गर्दी करीत आहेत. शेवटी ही लाल परी क्षमतेपेक्षा जास्त लोड झाल्याने बंद पडत असताना उबाठा शिवसेनेची बस तंदुरुस्त होऊन नव्या जोमाने धावू लागेल, तेव्हा त्या लालपरीतील फिरस्त्या प्रवाश्याना धाय मोकलून रडत बसावे लागेल. व जे प्रतिकूल काळातही बस मध्ये बसून राहिले ते आपल्या इच्छित स्थळी पोहचतील.आत्ता तर उद्धव व राज ठाकरे एकत्र आले आहेत, त्यामुळे हे डबल इंजिन नव्या जोमाने धावेल.

मेरा पाणी उतरते देख 
मेरे किनारेपर घर बनानेवालो
याद रखो मै समुंदर हुं
वापस लोटकर आऊंगा 
तब तेरा घर मेरे पेटमें
समा लुंगा !

अशी गर्जना करून बाळासाहेबांचे हे दोन वाघ निवडणुकीच्या जंगलात डरकाळी फोडून विरोधकांची शिकार करतील.
या धर्मयुद्धात माझ्या सारखे सत्तरी गाठलेले किंबहुना त्याही पेक्षा अधिक वयाचे लढवैये शेलार मामा बनून तलवार हाती घेऊन त्वेशाने  लढतील.

आगामी निवडणूक गद्दार विरुद्ध खुद्दार अशी असणार आहे. घरभेदी व दलबदलू  लबाडबोक्याना त्यांची औकात दाखवण्याची ही निवडणूक आहे. मतदारांनी पैश्यांना भुलू नये, कारण हे पैसे नंतर दुप्पट तिप्पट वसुल केले जाणार ते ही तुमच्या खिश्यात हात घालून, पाकीटमारी करून. जे खरे समाजसेवक आहेत त्यांना मतदान करा, मग तो कोणत्याही पक्षाचा का असेना. 

निवडणूक प्रचाराच्या वेळी आवर्जून सांगितले जाते, एकाच निशाणीवर बटण दाबा नाहीतर तुमची सर्व मतं बाद होतील. हे धादान्त खोटे असते. तुम्ही एकाच पॅनल मध्ये चार वेगवेगळ्या उमेदवारांना मत देऊ शकता. त्याही पुढे जाऊन एक शेवटचे बटण असते. ते म्हणजे NOTA तुम्हाला एखाद्या गटात जसे अ /ब /क/ड पैकी कोणताच उमेदवार पसंत नसेल तर तुम्ही हे बटण दाबून कोणासही नाही, असे सांगू शकता. 

या निवडणुकीत तब्बल 18 वर्षां नंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत, मुंबई व मराठी माणसाच्या हित रक्षणासासाठी आपण त्यांच्या योग्य उमेदवारांना मतदान केल्यास महाराष्ट्रात मराठी अस्मिता शाबूत राहील.
close