धार्मिक,अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक...
वाळकी प्रतिनिधी (दादासाहेब आगळे):- विज्ञानाच्या जगात लोक धार्मिक वाचनापासून दुरावत असल्याचा सूर सर्वत्रच निघत आहे.मात्र गुंडेगाव येथील पत्रकार संजय भापकर व प्रिती भापकर यांनी स्वत:ची मुलगी आरोही भापकर हिचा वाढदिवसाचा खर्च टाळून त्यातून एक प्रेरणादायी उपक्रम राबविला आहे.वाढदिवस म्हटले की महागडे कपडे,सजावट, हॉटेलमध्ये पार्टी,भोजनावळी,भला मोठा केक आणि उपस्थित मुलांना आकर्षक गिफ्ट असा खर्च केला जातो.मात्र या खर्चाला फाटा देत मुलांमध्ये धार्मिक वाचन संस्कृती रुजविण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ पुस्तके वाटप केली.यावेळी वाढदिवसानिमित "धार्मिक पुस्तक भेट' या उपक्रमाबद्दल ह.भ.प.योगिराज महाराज पवार शास्त्री यांनी भापकर यांचे कौतुक केले आहे.
'वाढदिवस' म्हटलं की मुलांना त्या दिवसाचं वेगळच कुतूहल आणि नाविन्य वाटत असतं. तो दिवस त्याच्यासाठी खास असतो. करण त्याने इतर बालमित्रांचाही वाढदिवस पाहिलेला असतो. त्यानुसार ते आपल्या वाढदिवसाची तुलना करत असतात. वाढदिवसानिमित्त मिळणाऱ्या वेगवेगळ्या भेटवस्तू ह्या त्यांच्यासाठी अनमोल खजिना असतो.परंतु आरोहीचा वाढदिवस एक धार्मिक अध्यात्मिक असा साजरा करुन समाजात आदर्श घडवला आहे.असे प्रतिपादन पवार शास्त्री यांनी सांगितले.
वाढदिवसानिमित्ताने आम्हा सर्वांना दिलेली हरिपाठ पुस्तक भेट ही खूप भावलं.ही मिळालेली भेट नक्कीच आयुष्यभर शिदोरी म्हणून कायम सोबत राहील यात शंका नाही.असे उपस्थित नागरिकांनी भावना व्यक्त केली याप्रसंगी ह.भ.प संभाजी महाराज भापकर,ह.भ.प.साहेबराव महाराज भापकर, ह.भ.प अशोक महाराज पिंपरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अभिलाष घिगे, युवा नेते दादासाहेब दरेकर, उपसरपंच नानासाहेब हराळ, माजी उपसरपंच संतोष भापकर, माजी उपसरपंच सुनील भापकर, पत्रकार दादासाहेब आगळे,पत्रकार संजय भापकर यावेळी राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील असंख्य मंडळी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी जय मल्हार तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

