shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नागरिकांच्या समस्यांना प्रथम प्राधान्य..!आप्पासाहेब ढूस.

 प्रभाग क्रमांक 07 मधील मोठ्या संख्येने नागरिक अभिनंदन करण्यासाठी भेटायला येत आहेत.. परंतु सत्कारापेक्षा नागरिकांच्या समस्यांना आमचे प्रथम प्राधान्य असणार आहे..! आज आम्ही नगरपालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पहिल्याच दिवशी सुरुवात केली.. 

     प्रभागातील सार्वजनिक शौचालयांना दरवाजे बसविणे.. तेथील स्वछता करणे.. सेप्टिक टाकीची दुरुस्ती करणे.. पाणी व्यवस्था करणे.. बंद असलेले पथदिवे सुरू करणे.. आदी बाबद संबंधित अधिकाऱ्यांना आज सूचना दिल्या आहेत.. 
     तसेच.. प्रसादनगर भागातून खडी, मुरुम भरून वाहतूक करणाऱ्या बारा चाकी डंपरची माहिती येऊन विठा माधव तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात रहदारीस अडथळा ठरणारी तसेच प्रसादनगर भागात अपघाताला निमंत्रण देणारी ही वाहने शिव रस्त्याने गुंजाळ नाका कडे वळविने बाबद संबंधित ठेकेदारांशी चर्चा केली.. लवकरच येथील रहदारीवर नियंत्रण मिळवून नागरिकांना भेडसावणारा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील.. त्यासाठी प्रसाद नगर जवळून जाणाऱ्या शिव रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावे लागतील व आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत.. नगरपालिकेकडे लवकरच तसा प्रस्ताव सादर करण्यात येईल.
आप्पासाहेब भिमराज ढूस 
देवळाली प्रवरा
close