shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीच्या साईनाथ विद्यालयात नरेश सुराणा यांचा सत्कार; 'मुख्यमंत्री सहायता निधी'च्या माध्यमातून रुग्णसेवेचा गौरव

'एनसीसी'च्या शिस्तीमुळेच समाजसेवेचे बळ; नरेश सुराणा यांनी जागवल्या शाळेतील आठवणी

शिर्डीच्या साईनाथ विद्यालयात नरेश सुराणा यांचा सत्कार; 'मुख्यमंत्री सहायता निधी'च्या माध्यमातून रुग्णसेवेचा गौरव

शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
शाळेत असताना एनसीसीने दिलेली शिस्त, आत्मविश्वास आणि राष्ट्रप्रेम हे संस्कार आयुष्यभर सोबत राहतात. विद्यार्थी दशेत ज्या मैदानात शिस्तीने बसून पाहुण्यांकडे पाहायचो, आज त्याच शाळेत सन्मानाने पाऊल टाकताना बालपण आणि जुन्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या. शाळेने दिलेले हे संस्कारच आज गोरगरीब रुग्णांची सेवा करण्यासाठी प्रेरणा देत आहेत, असे प्रतिपादन श्री. नरेश सुराणा यांनी केले.
येथील श्री साईनाथ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह व चेअरमन मा. छायाताई फिरोदिया आणि विश्वस्त मा. मनोजशेठ लोढा यांच्या हस्ते नरेश सुराणा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मागील सात वर्षांपासून 'मुख्यमंत्री सहायता निधी'च्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांपर्यंत मदत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी अविरत सुरू ठेवले आहे, त्याबद्दल हा गौरव करण्यात आला.
बालपणीच्या आठवणींना उजाळा
सत्काराला उत्तर देताना श्री. सुराणा भावुक झाले. ते म्हणाले की, आज शाळेत पाऊल टाकताच एनसीसीचे ते दिवस आठवले. एकेकाळी आम्ही विद्यार्थी म्हणून खाली बसून शिस्तीत कार्यक्रम पाहायचो. एनसीसी कॅडेट्सच्या रांगेतून प्रमुख पाहुणे जाताना तो क्षण मनात कोरला जायचा. आज त्याच मार्गावरून चालताना, त्या गणवेशाला आणि शाळेच्या संस्कारांना मनापासून सलाम करावासा वाटला.
देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळेच जनसेवा शक्य
रुग्णसेवेचे हे कार्य राज्याचे लोकप्रिय नेते, मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे आणि मार्गदर्शनामुळे शक्य होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री सहायता निधी हा सर्वसामान्यांसाठी आणि गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरला आहे. यापुढेही समाजसेवेसाठी आपण कटिबद्ध राहू, अशी ग्वाही नरेश सुराणा यांनी यावेळी दिली.
यावेळी शाळेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close