shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री.सुभाष विधाते यांचा परिचय व कार्य गौरव !

सरकारी कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या कामांना मिळणारी मान्यता, भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलन आणि सामाजिक कामाचे महत्त्व जाणून आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते मा. सुभाष विधाते*

राहाता / प्रतिनिधी:
लोकशाही व्यवस्थेत सरकार हे जनतेसाठी असते आणि सरकारी कर्मचारी हे जनतेचे सेवक मानले जातात. मात्र आजच्या वास्तवात काही ठिकाणी ही संकल्पना केवळ कागदावरच उरलेली दिसते. सरकारी कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या कामांना मिळणारी मान्यता, पैसे देऊन बेकायदेशीर कामांना परवानग्या देणारा अधिकारी वर्ग आणि यामुळे सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागणारा त्रास ही गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. या अन्यायाविरोधात उभे राहणारी आंदोलने आणि सामाजिक कामाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरते.


आज अनेक सरकारी कार्यालयांमध्ये नियम व कायदे पायदळी तुडवले जात असल्याचे दिसून येते. बांधकाम परवानग्या, जमिनीचे व्यवहार, शासकीय योजना, दाखले, परवाने अशा अनेक बाबतीत पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, अशी सर्वसामान्यांची भावना बनली आहे. काही अधिकारी आणि कर्मचारी आपल्या पदाचा गैरवापर करून चुकीच्या कामांना जाणीवपूर्वक मान्यता देतात. यामुळे कायद्याचे पालन करणाऱ्या प्रामाणिक नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, तर भ्रष्ट मार्ग अवलंबणाऱ्यांचे फावते. मोठ्यांना बढत व सर्वसामान्यांना अडत अशा पध्दतीने सरकारी कर्मचारी यांना कायद्याच बडगा दाखवून त्यांना कायदेशीर काम करायला भाग पाडणारे सामाजिक कार्यकर्ते सुभाष विधाते होय.

चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या सरकारी कर्मचारी धोरणाविरोधात निवेदन, आंदोलन व उपोषण करुन व्यवस्थेला हादरवणारे सुभाष विधाते हे सर्वसामान्य व गरीब लोकांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाले.

मानवाधिकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष असताना अनेक गोरगरीब लोकांची कामे करुन देण्याच्या धडाकयामुळे समितीने सुभाष विधाते यांना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदावर बढती दिली.
यामुळे समिती कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
close