देहरे | प्रतिनिधी
“फक्त गृपवर गप्पा मारण्यापेक्षा मैदानात आणि रस्त्यावर उतरा…”
हा केवळ नारा नव्हता, तर व्यवस्थेच्या छातीत घुसणारा इशारा होता.
अहिल्यानगर–शिर्डी–मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट, अर्धवट आणि जीवघेण्या रस्त्याविरोधात अखेर जनतेचा उद्रेक झाला. देहरे परिसरात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आणि ‘हा अपघात नाही, हा व्यवस्थेचा खून आहे’ असा संतप्त आरोप करत प्रशासनाला जाब विचारला.
✝️ रितेशचा मृत्यू – अपघात नव्हे, तर बळी
देहरे (ता. अहिल्यानगर) येथील रितेश चंद्रकांत खजिनदार (वय २०) हा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारा, अत्यंत हुशार, आध्यात्मिक विचारांचा, देशप्रेम व धर्मप्रेम जपणारा तरुण या महामार्गाच्या बेजबाबदार कामाचा बळी ठरला.
रितेश एकटाच नाही.
काल कोणी गेला…
आज रितेश गेला…
उद्या आपल्यापैकी कुणाचा नंबर लागणार?
हा प्रश्न आज प्रत्येक घरात विचारला जात आहे.
🚧 पाच वर्षांचे काम, पण रस्ता कधी पूर्ण?
या राष्ट्रीय महामार्गाचे काम कागदावर गेली पाच वर्षे सुरू आहे.
*प्रत्यक्षात मात्र –
*आजवर तीन ठेकेदार बदलले
*तीन ते चार वेळा टेंडर प्रक्रिया
*चार वेळा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च
*खोदकाम करून रस्ता तसाच सोडून दिला
*निकृष्ट साहित्य, शून्य देखरेख
*अपघातांची मालिका, मृत्यूंचा सडा
नागरिकांच्या मते, गेल्या दहा वर्षांत २००० हून अधिक नागरिकांनी या महामार्गावर प्राण गमावले आहेत.
सध्या ₹२५०० कोटींच्या निधीची चर्चा सुरू असली, तरी कामाची गुणवत्ता पाहता “सहा महिन्यांत पुन्हा हीच परिस्थिती निर्माण होणार” अशी तीव्र शंका नागरिक व्यक्त करत आहेत.
✊ देहरे बस स्थानकाजवळ सुमारे दोन हजार पेक्षा अधिक ग्रामस्थांचा रस्ता रोको
या पार्श्वभूमीवर ३० डिसेंबर २०२५ रोजी देहरे बस स्थानकात चार-पाच गावांतील नागरिक एकत्र आले.
दोन हजारांहून अधिक ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत जोरदार आंदोलन केले.
हे आंदोलन कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नव्हते, तर
👉 “पुढचा रितेश वाचवण्यासाठी” होते.
👮 पोलिसांचा चोख बंदोबस्त, आंदोलनकर्त्यांचे समाधान
यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. चौधरी साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवत परिस्थिती शांततेत हाताळली.
ठेकेदार प्रतिनिधीला त्यांनी स्पष्ट शब्दांत तंबी देत महामार्गाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी सांगितले.
यामुळे आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले असून, नागरिकांनी चौधरी साहेबांचे विशेष आभार मानले.
🗣️ “निधी खर्च होतोय, पण लोकप्रतिनिधी गप्प” – पै. राजकुमार आघाव
यावेळी बोलताना पै. राजकुमार आघाव यांनी तीव्र शब्दांत खंत व्यक्त केली.
ते म्हणाले,“हा महामार्ग पाच वर्षांपासून सुरू आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होतोय, पण कामाची गुणवत्ता शून्य आहे. लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नाकडे डोळेझाक करत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे.”
👥 आंदोलनात मान्यवरांची उपस्थिती
या आंदोलनाला ज्येष्ठ व जबाबदार नागरिकांचा भक्कम पाठिंबा मिळाला.
यावेळी –
जेष्ठ नागरिक विश्वास जाधव,मांजरसुंबाचे सरपंच जालींदर कदम,व्हि. डी. काळे, संजय शिंदे,बाबासाहेब गायकवाड,मेजर काळे ,मेजर बालवे,दत्तात्रेय धनवटे, मेघनाथ धनवटे, बी. जी. लांडगे,महेश काळे,अमोल काळे, नितीन भांबळ, मुन्ना लांडगे,सुरज धनवटे, तसेच मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
📣 ठाम मागण्या – दिल्लीपर्यंत आवाज जाणार!
संतप्त नागरिकांनी एकमुखाने पुढील ठोस मागण्या केल्या
*महामार्गाचे काम तातडीने आणि दर्जेदार पूर्ण करा
*निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा
*जबाबदार अभियंते व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा
*मृतांच्या कुटुंबांना योग्य भरपाई द्या.
*कायमस्वरूपी, सुरक्षित आणि टिकाऊ रस्ता तयार करा
🕯️ प्रशासन जागं होणार की अजून बळी हवेत?
रितेश खजिनदारचा मृत्यू प्रशासनाला जागं करणार की अजून किती तरुणांचे बळी जातील?
हा प्रश्न आज संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा विचारतो आहे.
“ही पाळी कोणावरही येऊ नये – म्हणूनच हे आंदोलन!”
असा निर्धार व्यक्त करत नागरिकांनी इशारा दिला आहे की, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.
जय हिंद 🇮🇳

